SIP म्हणजे काय ?
या विषयाबद्दल खूप कुतूहल, उत्सुकता आणि भीती आहे. खूप सारे प्रश्न पडलेले आहेत… पण कोणाला विचारायचे ते समजत नाही.. या क्षेत्रात काम करणारेही अगदी कमी…
म्युचुअल फंड मधे गुंतवणूक करताना दोन प्रकाराने करता येते…
1) एकरकमी काही पैसे एकाच वेळी गुंतवायचे.
उदा. आज म्युचुअल फंडच्या एका स्कीममधे एक लाख रूपये गुंतवले. आजच्या किमतीत ( NAV) खरेदी झाली. काही काळानंतर जेव्हा किंमत ( NAV ) वर जाईल तेव्हा नफा होऊन पैसे काढून घेता येतील.
2) SIP म्हणजे Systematic Investment Plan. दरमहिना ठराविक रक्कम म्युचुअल फंडच्या एका स्कीम मधे गुंतवत रहायची. …ही गुंतवणूक बॅन्क खात्यातून auto debit ने दरमहिन्याला ठराविक तारखेला होत रहाते…. कितीही वर्षांसाठी ही गुंतवणूक चालू ठेवता येते तसेच कधीही थांबवता येते….कधीही यातील रक्कम वाढवू शकतो अथवा कमी करू शकतो…दर महिन्यात छोटी रक्कम गुंतवली जाते, वेगवेगळ्या किमतीत ( NAV) खरेदी होते, सरासरीचा फायदा होतो, मार्केट सारखं बघावं लागत नाही,
उदा. दर महिना रू. 5000/- ची SIP केली आणि वीस वर्ष चालू ठेवली तर साधारणतः पन्नास लाखाची मालमत्ता आपण बनवू शकतो. अर्थात यासाठी स्कीम चांगली निवडणं आणि मार्केटने साथ देणं अशा गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
श्रीमंत होण्याचा हा एक राजमार्ग ठरू शकतो…यावर विश्वास ठेवा…
- Janhavi M.Sathe
(09820438968)