आरकॉइरिस – गिफ्टिंगला नव्या उंचीवर नेणारे नाव!

आजच्या काळात एखाद्या खास प्रसंगी आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देताना अनेक नवनवीन पर्यायांच्या गर्दीत वैयक्तिक स्पर्श हरवून जाताना दिसतो. अशा प्रसंगी ‘आरकॉइरिस’ नावाचा ब्रँड भेटवस्तूंमधील सर्जनशीलता आणि वैयक्तिकीकरणात एक आदर्श उदाहरण ठरू शकतो. आधुनिक युगात ‘गिफ्टिंग’ ही प्रक्रिया केवळ वस्तूंची देवाणघेवाण राहिली नसून, ती एक भावना व्यक्त करण्याचे माध्यम बनली आहे. अशा वेळी, नेहा गडोडिया यांच्या ‘आरकॉइरिस’ने गिफ्टिंग क्षेत्राला एक नवा आयाम दिला आहे. २००७ साली सुरू झालेल्या या कंपनीने गिफ्टिंग क्षेत्रात एक वेगळी छाप उमटवली आहे. 

आरकॉइरिस  एक गिफ्टिंग कंपनी आहे जी सर्जनशीलता, वैयक्तिकीकरण, आणि उच्च दर्जाच्या गिफ्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. ते विविध प्रसंगांसाठी, जसे की कॉर्पोरेट गिफ्टिंग, सणासुदीच्या भेटवस्तू, लग्न आणि विशेष कार्यक्रमांसाठी गिफ्ट्स तयार करतात. त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक गिफ्टला एक खास आणि व्यक्तिगत अनुभव देणे. 

‘आरकॉइरिस’ हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ आहे ‘इंद्रधनुष्य’. कंपनीचे नावच त्यांच्या सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. त्यांच्या लोगोमध्ये इंद्रधनुष्याच्या सात रंगांचा समावेश आहे, जो आनंद, विविधता, आणि भावनांना प्रतिबिंबीत करतो. नेहा गडोडिया यांच्या मते, प्रत्येक गिफ्ट ही एक अनोखी भावना असते, आणि तीच भावना त्यांच्या ब्रँडच्या नावात आणि लोगोमध्ये प्रतिबिंबित होते. “Unwrap moments, Create happiness” ही आर्कोआइरिसची टॅगलाईन आहे. 

अगदी अल्प वेळेत मोठ्या प्रमाणावर उत्पादने वितरित करण्याची क्षमता ही त्यांची खासियत बनली आहे. त्यांच्याकडे गिफ्टिंगसाठी सर्व प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. कारण आरकॉइरिस विविध प्रकारच्या ग्राहकांसाठी काम करत आहे. त्यांचे ग्राहक हे प्रोडक्शन हाऊस, सेलिब्रिटी, फार्मा कंपन्या, कॉर्पोरेट्स, लॉजिस्टिक्स, शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, बिल्डर्स आणि डेव्हलपर्स अशा विविध क्षेत्रातील आहेत. 

शाळा-महाविद्यालयांसाठी बॅग्स, टी-शर्ट्स, ट्रॉफीज; कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी जॉइनिंग किट्स, सीईओ-एच.आर लेव्हल गिफ्ट्स; बिल्डर्ससाठी गृहप्रवेशाच्यावेळी ग्राहकांना देता येतील असे पझेशन हॅम्पर्स; तसेच दिवाळी, ख्रिसमस, रक्षाबंधन, नवरात्र, गणेश चतुर्थी अशा सणांसाठीही त्यांच्याकडे विशेष भेटवस्तू उपलब्ध आहेत. फक्त व्यावसायिक गिफ्टिंगच नाही, तर लग्न, वाढदिवस, वर्धापन दिन यांसारख्या खास क्षणांसाठी, तसेच डॉक्टर डे, टीचर्स डे, व्हॅलेंटाईन डे, दिवाळी, ख्रिसमस, संक्रांत, नवीन वर्ष, रक्षाबंधन, गणपती, नवरात्र अशा प्रत्येक सण आणि उत्सवासाठी खास भेटवस्तू त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.  

विशेष म्हणजे आरकॉइरिस  कधीही, कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या क्लाइंट्सना नकार देत नाही. त्यामुळेच त्यांच्या जवळजवळ 95% विचारणा या ऑर्डरमध्ये रूपांतरीत होतातच.  

आरकॉइरिसने अनेक मोठ्या प्रकल्पांना वेळेवर पूर्ण केले आहे. त्यांनी ब्लू स्टार या कंपनीसाठी ६ तासांत ३०० कस्टमाइज्ड रॉकस्टोन्स तयार करून वितरित केले आहेत. तसेच हिरानंदानी बिल्डर्ससाठी त्यांनी यंदा दिवाळी गिफ्टिंग प्रकल्प पार पाडला होता. त्यावेळी केवळ १५ दिवसांत त्यांनी २५०० षटकोनी ड्रायफ्रूट बॉक्सेस तयार केले, ज्यामध्ये सात प्रकारचे ड्रायफ्रूट्स भरले होते. हे बॉक्सेस हिरानंदानी बिल्डर्सच्या लोगोने ब्रँडेड होते आणि विविध ठिकाणी वेळेवर पोहोचवण्यात आले. हा प्रकल्प आर्कोआइरिससाठी यशस्वी सहकार्याचा एक उत्तम नमुना ठरला. आरकॉइरिसच्या या कार्यक्षमतेमुळेच आजवर ग्राहक त्यांना विश्वासाने निवडत आले आहेत.  

आरकॉइरिसकडे यावर्षी एक नवीन भेटवस्तू सादर करण्यात आली आहे. ३ महिन्यांपासून ते १३ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी कस्टमाइज्ड नाईटसूट्स. या खास गिफ्टिंग पर्यायाने लहान मुलांसाठी आनंदाचे क्षण आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. प्रत्येक नाईटसूट वैयक्तिक गरजेनुसार साजेसा करण्यात आला आहे.

आरकॉइरिस उत्पादनाच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड करत नाही. त्यांची ७ टप्प्यांची गुणवत्ता तपासणी प्रक्रिया ही त्यांच्या दर्जेदार सेवांची ओळख आहे. शिवाय, १२ तासांत ५०० कस्टमाइज्ड गिफ्ट्स तयार करण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. त्यांचे ग्राहक त्यांच्या वेगवान डिलिव्हरी सेवांबद्दल नेहमीच समाधान व्यक्त करतात. आर्कोआइरिस हा केवळ एक ब्रँड नसून, ग्राहकांच्या समाधानाचा एक विश्वासार्ह मार्ग बनला आहे. 

व्यवसायाबरोबरच आरकॉइरिसने सामाजिक जबाबदारीही पार पाडली आहे. CSR उपक्रमांतर्गत, कंपनी त्यांच्या उत्पन्नाचा १/१० भाग समाजासाठी देणगी स्वरूपात देते. महिलांना गिफ्ट तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, हा त्यांच्या सामाजिक कार्याचा एक भाग आहे. “आव्हानांकडे अडथळा म्हणून न पाहता संधी म्हणून बघा,” असा संदेश नेहा गडोडिया देतात. त्यांचा प्रवास प्रत्येक महिलेला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी प्रेरित करतो.  

आरकॉइरिसच्या संस्थापक, नेहा गडोडिया, यांनी वेलिंगकर इन्स्टिट्यूट, मुंबई येथून जाहिरातशास्त्र, व्यवसाय व्यवस्थापन, आणि उद्योजकता यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. मात्र, त्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरते स्वतःला सीमित न ठेवता, कला, भरतनाट्यम, पाककला, दागिन्यांच्या डिझायनिंगसारख्या विविध कौशल्यांमध्ये प्रावीण्य मिळवले आहे. त्याच सर्जनशीलतेला व्यवसायाचे रूप देऊन त्यांनी आर्कोआइरिसची स्थापना केली. त्यांच्या सर्जनशीलतेचा परिपाक आर्कोआइरिसच्या प्रत्येक उत्पादनात दिसून येतो. 

आरकॉइरिसमध्ये गिफ्ट्स तयार करण्याची प्रक्रिया केवळ उत्पादन निर्मिती नाही, तर ती एक कला आहे. प्रत्येक भेटवस्तू ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केली जाते.

नेहा गडोडिया यांचे स्वप्न आहे की आरकॉइरिसचे एक सुंदर शोरूम असावे आणि देशभरातील त्यांची उपस्थिती वाढत राहावी.  

Deloitte, KPMG, Godrej Properties, Tata, Mahindra या कंपन्यांबरोबर भविष्यात कॉर्पोरेट गिफ्टिंग, कर्मचारी किट्स, कॉर्पोरेट बर्थडे गिफ्टिंग आणि नवीन कर्मचारी वेलकम किट्स अशा गिफ्टिंगसाठी काम करण्याची आर्कोआयरिसची इच्छा आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मुंबईबाहेरही अनेक ग्राहक जोडले आहेत. या ग्राहकांचे प्रेम आणि “वर्ड ऑफ माऊथ” हीच त्यांची खरी ताकद बनली आहे.  

गिफ्टिंगला सर्जनशीलता, वैयक्तिकीकरण, आणि उत्कृष्टतेचा स्पर्श देणाऱ्या आर्कोआइरिसने गिफ्टिंगच्या परिभाषेलाच बदलून टाकले आहे. जर तुम्हालाही तुमच्या प्रियजनांसाठी खास गिफ्ट घ्यायचे असेल किंवा कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी अनोखा अनुभव घ्यायचा असेल, तर आर्कोआइरिस हा सर्वोत्तम पर्याय आहे.   

आरकॉइरिसशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण गिफ्टिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी, आजच त्यांच्याशी संवाद साधा. प्रत्येक प्रसंगासाठी खास गिफ्ट्स तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे, आर्कोआयरिस तुमच्या गिफ्टिंग अनुभवाला एक नवा आयाम देईल यात काही शंका नाही!
– गौरवी तेली 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu