थिन्कमराठी.कॉम तर्फे प्रकाशित पहिले पुस्तक- ‘आगळं- वेगळं’

थिंकमराठी डॉट कॉम तर्फे प्रकाशित पहिलं पुस्तक – ‘आगळं – वेगळं’

लेखक – डॉ. मिलिंद न. जोशी
प्रकाशक – चंदा मंत्री, थिंकमराठी डॉट कॉम पब्लिकेशन

प्रवास माणसाला आतून बाहेरून बदलून टाकतो , प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो…. हे वाक्य ऐकल्यासारखं वाटतंय ना ? हो … झिम्मा सिनेमाच्या प्रोमोमध्ये … ज्यांनी हा सिनेमा बघितला आहे त्यांनाही या वाक्याचा खरा अर्थ उलगडला असेलच; कारण खरंच प्रवास माणसाला खूप काही शिकवून तर जातोच पण मनाला  एक नवी उभारी आणून पुन्हा चैतन्य निर्माण करायचं कामही प्रवास करतच असतो.

प्रवास , पर्यटन , भटकंती नाव काहीही ठेवा पण फिरायला जायचं म्हटलं की  मनात एक नवा उत्साह निर्माण होतो. मग नेहमीची ठिकाण पाहण्यापेक्षा काहीतरी नवं बघूया असं म्हणणारे निघतात नवीन प्रदेश शोधायला आणि काही अनोखं गवसलं तर मग सोने पे सुहागा …. अशाच आगळ्या वेगळ्या ठिकाणांबद्दलची माहिती, त्या ठिकाणांचं खुमासदार शैलीत वर्णन आपल्या ‘आगळं-वेगळं’ या पुस्तकात डॉ. मिलिंद जोशी यांनी केलं आहे.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे खरंच ‘आगळं-वेगळं’ हे पुस्तक म्हणजे “१५ पर्यटनयोग्य स्थळांच्या वर्णनाचा गुलदस्ता आहे. यातील काही ठिकाणं मुंबई पुण्याजवळची, काही आपल्या देशातील तर काही विदेशातीलही. काहींची नावं आपण ऐकलेली, काहींची नव्याने ठाऊक होणारीही, त्यामुळे पुस्तकाचं ‘आगळं वेगळं’ हे वेगळ्या धाटणीचं नाव समर्पक ठरतं. प्रवासाची आवड प्रत्येकालाच असते असं नाही. पण हे पुस्तक वाचल्यावर ती आवड जागी व्हावी असं चैतन्य या पुस्तकात नक्की आहे.”

आम्हाला कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की हे पुस्तक प्रिंट आणि ई बुक अशा दोनही स्वरूपात उपलब्ध करण्यात आलं आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आपलं प्रिंट पुस्तक ऑर्डर करू शकाल अथवा ईबुक विकत घेऊ शकता. 

प्रिंट बुक ऑर्डर करण्यासाठी : GPAY- 9769261182  
पेमेंट केल्यावर कृपया आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नं. आणि इमेल आयडी 9769261182 या  नंबर वर व्हाट्सअप करावा  अथवा [email protected] 
या ई-मेल आयडी वर मेल करावे   

ई- बुक विकत घेण्यासाठी लिंक :  

मोबाईलवर खरेदी करण्यासाठी – 
https://play.google.com/store/books/details?id=HK1JEAAAQBAJ

लॅपटॉप अथवा डेस्कटॉप वर खरेदी करण्यासाठी 
https://books.google.co.in/books/about?id=HK1JEAAAQBAJ&redir_esc=y&hl=en

अधिक माहितीसाठी संपर्क :
८१६९८२५९६१ / ९७६९२६११८२
[email protected]

‘आगळं वेगळं’ पुस्तकाबद्दल आलेले निवडक अभिप्राय.


‘प्रवासवर्णन’ हा साहित्यप्रकार प्रदेश ,प्रवासी आणि प्रवास या तीन घटकांनी आकारास येत असतो.प्रवासी प्रदेशाचा प्रवास करतो आणि त्यानंतर त्या प्रवासाचे लेखन करतो. त्याच्या या लेखनातून वाचकांना त्या प्रदेशाची नवी अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच प्रवासवर्णन हा साहित्यप्रकार इतर साहित्यप्रकारांपेक्षा वेगळा ठरतो. अशा वेगळ्या लेखनप्रकारात लेखन करणारे प्रवासवर्णनकार डॉ. मिलिंद जोशी यांच्या तीन प्रवासवर्णनपर पुस्तकांनंतर ‘आगळं- वेगळं’ हे चौथे प्रवासवर्णनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.त्यांच्या आधीच्या तीन पुस्तकांप्रमाणे हे पुस्तकही वाचकांना विविध  प्रदेशांची नवी अनुभूती देईल, हे निश्चित. लेखकाकडून विविध प्रदेशांचा आणि त्यानंतरच्या लेखनाचा प्रवास सतत घडत राहो , ही सदिच्छा आणि  मनःपूर्वक अभिनंदन.

समीर जाधव,
मराठी विभाग प्रमुख,
साठये महाविद्यालय.


आपण रसायनशास्त्र जेवढया अधिकाराने शिकवता, किचकट गुंतागुंतीच्या प्रक्रिया सहजतेने समजावता , त्याचे अप्रूप वाटत नाही कारण तो तुमचा प्रांत आहे.
मात्र आपली  प्रवासवर्णने , पर्यटन स्थळांची निवड, तेथे जाऊन काय पाहायचे याची पूर्वतयारी, तेथील ऐतिहासिक तपशीलवार बारकाव्यांसह नोंदी , सारं  काही अचंबित करणारे .
स्थलदर्शनाचा आनंद घेणे, चांगल्या गोष्टी अधोरेखित करणे व उणिवांवर विनोदी अंगाने टिपणी करणे. वाचकाला आभासी भ्रमण घडवणे ही भट्टी आपल्या लेखनातून छानच जमली आहे.
वर्णनाची अचूकता, भाषेवरचे प्रभुत्व, कथानकाचा वेग सारे काही वाचकाला खिळवून ठेवते. पुस्तकाचा शेवट मेजवानी नंतरचा आनंद चेहऱ्यावर ठेवून जातो.
याच भावनेतून ‘आगळं-वेगळं’ अधिक  आनंददायी असेल , याची खात्री आहे. पुस्तकाचे स्वागत व सरस्वतीच्या दरबारात अजून एक पुष्प सादर केल्याबद्दल आपले अभिनंदन.

प्रा. डॉ. नेरकर,
उपप्राचार्य, साठये महाविद्यालय.

 


मनःपूर्वक अभिनंदन सर 🙏
अशीच उत्तरोत्तर आपण आम्हाला ग्रंथ स्वरूप मेजवानी द्या.

सचिता नाईक,
ग्रंथपाल, साठये महाविद्यालय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu