वसंत ©️ चारूलता काळे

– वसंत –

ऋतु वसंत आला, तना-मनाला, 

चैतन्याचा साज,

वना-वनातुन पंचम छेडित,

कोकिळ विहरे आज.

ऋतुराज असा हा, उधळित येतो,

केशर कुमकुम रंग,

गुलमोहर फुलतो, पळसही वेडा,

अपुल्या नादी दंग.

ऋतु प्रेमाचा, मोहरून जाई,

आम्रवृक्षही खुळा,

अखंड गुंजन, चटोर भुंगा,

कलिकेचा त्या लळा.

ऋतु फुलण्याचा, ऋतु झुलण्याचा, 

ऋतु प्रीतीचा हा हळवा,

ऋतु मदनाचा, मोहरण्याचा,

कुणी सजणाला, त्या कळवा.

  • चारूलता काळे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu