हिंदू धर्मातील सोळा संस्काराचे महत्व..

हिंदू धर्मातील सोळा संस्काराचे नक्की महत्व काय …..
भारतीय पूर्वाधा-यांनी मानवाचे शरीर,मन,आत्मा यांचा सर्वागिण विकास होण्यासाठी व मानव जन्माचे सार्थक कशात आहे हे समजावून सांगण्यासाठी चार पुरुषार्थ चार आश्रम,आणि सोळा संस्कारांची एक मालिका मानवासाठी दिलेली आहे.तिथे शक्य तेवढे यथा योग्य पालन करुन आपले जीवन सुखी होण्यासाठी दिलेला हा एक कानमंत्रय आहे असे महणावे लागेल.

चार पुरुषार्थ चार आश्रम,आणि सोळा संस्कार पुढील प्रमाणे आहेत..

(१) चार पुरुषार्थ – (अ) धर्म (4) अर्थ (क) काम (ड) मोक्ष.
(२) चार आश्रम- (अ) ब्रहाचर्य (ब) गृहस्थ (क) वानप्रस्थ – (ड) संन्यास.
(३) सोळा संस्कार-(4) गर्भाधान (२) पुंसवन (9) सीमंतोन्नयन (४) जातकर्म (५) नामकरण – (६)निष्कमण (७) अन्नप्राशन (८) चुडाकर्म (९)कर्णवेद (१०) उपनयन (११) वेदारंभ (१२) समावर्तन (१३) विवाह.. (१४) वानप्रस्थ (१५) सन्यास (१८) अंत्येष्टी.

असे हे एकूण चोवीस संस्कार निर्मिलेले आहेत.  त्याची माहिती येणे प्रमाणे,
(१) गर्भाधान –हा संस्कार पति पत्नी या दोघांवर  केला जातो त्या योगे बीज व गर्भ मलिनता दूर व्हावी गर्भ निर्दोष हावा हा प्रमुख हेतू या संस्कारामागे आहे. भविष्यातील संकट टाळण्यासाठी हा संस्कार आवश्यकच आहे.
(२) पुसंवन – हा संस्कार स्त्री गरोदर असताना तिला कन्या ऐवजी पुत्र प्राप्तीच व्हावी याकरिता हा विधी चौथ्या किंवा पाचव्या महिन्याच्या गरोदर कालावधीत केला जातो. (हा संस्कार स्त्री पुरुष बीजाशी संबंधीत असतो असे वाटते)
(३) सीमंतोन्नयन- गर्भाच्या शुध्दीसाठी हा संस्कार केला जातो. (मंत्र सामाशी निगडीत हा संस्कार आहे)
(४) जातकर्म- मातेने गरोदर पणात भोजनात जर काही सदोष अन्न खाल्ले असेल तर याची या संस्कारातून शुध्दीकेली जाते.
(५) नामकरण- मुलाचे आयुष्य,बुद्दी याची वाढ व्हावी म्हणूनच आणि लौकिक व्यवहारासाठी हा नामकरण विधी केला जातो,म्हणजेच त्याला पाळण्यात घालून त्याचे लौकिक दृष्टीने व्यवहारासाठी नाव निश्चित केले जाते. (जन्म कुंडलीत राशीप्रमाणे आलेल्या आद्याक्षराप्रमाणे नाव ठेवलेच पाहिजे असा आग्रह नाही,फक्त ते नाव संध्येसाठीच  वापरले जाते. शिवाय ते नाव माहित असल्यास तुमची रास व जन्मनक्षत्र कोणते आहे याचा यावरुन बोध होतो.
(६) निष्क्रमण- लहान मुलास विश्वाचे आद्यशक्तिपीठ सूर्यनारायण यांचे दर्शन मंत्रयुक्त संस्काराने केले जाते.
(७) अन्न प्राशन – या संस्काराने मातेच्या गर्भात मलिन अन्नरसाने जे दोष निर्माण होतात त्याचे परिमार्जन केले जाते.
वरील सातपैकी पाच संस्कार स्त्रीचे गर्भवासात केले जाऊन गर्भधारणेतील सर्व दोषांचे परिमार्जन केले जाते.
(८) चुडाकर्म – बल,तेज,आयुष्य यांचे वाढीसाठी हा संस्कार केला जातो.
(९) कर्णवेध – आरोग्यासाठी मुलाचे कान, व नाक सोन्याच्या तारेने टोचले जातात ( अँक्यु पंक्चर हा शास्त्रीय आधारीत विधी अशा प्रकारे संपन्न केला जातो.)
(१०) उपनयन – या संस्कारात विद्या ग्रहण करणे, मंत्र दिक्षा देणे ज्ञान व सुसंस्कार यांचे वाढीसाठी हा संस्कार आहे.
(११) वेदारंभ –विविध विद्या,कला,शास्त्रे,वैद उपनिषदे आदिंचे ज्ञान प्राप्तीने या संस्काराला सुरुवात केली जाते.
(१२) समावर्त- विद्याभ्यास,ज्ञान,यांचे नंतर ब्रह्मचर्य व्रताची समाप्ती झा संस्काराने केली जाते..
(१३) विवाह संस्कार – मनुष्य जीवनातील हा अत्यंत महत्वाचा संस्कार समजला जातो.सोळा संस्कारात हा एक श्रेठ असा संस्कार आहे.काम,क्रोध,मद, मत्सर,या सारखे विकार घालविणे ,धर्म ,अर्थ,काम मोक्ष,या चार पुरुषार्थाची (पति -पत्नी) या दोघांची वाटचाल करणे.सुप्रजनन,मानवता,पराक्रम,यांची योग्य वाढ करणे मनुष्यप्राणी व इतर प्राणी यातील भेद – समजावून घेऊन सांगून त्या वधू वरांना सामाजिक भावनाद्वारा नविन विश्व निर्मिती,पालकत्व आदी विषयांची संस्काराने युक्त अशी जाणीव करून देणे,हाच या संस्कारामागील खरा उद्देश आहे हे मनावर बिंबवणे.
(१४) वानप्रस्थ – हा आश्रम गृहा शिवाय संस्कार आहेत.यामध्ये विवाह संस्कारातील षडरिपुंचा समतोल सांभाळून हळू – हळू आत्मशोधनासाठी जरा वेगवेगळी पध्दती अवलंबिणे म्हणजेच संसारातून स्वत:चे  लक्ष परमेश्वर चिंतनाकडे देणे.
(१५) सन्यास – हा संस्कार असून शिवाय पुरुषार्थ आहे.यामध्ये वानप्रस्थाश्रमातील वेगळी जीवन पध्दती अंगीकार – केल्यामुळे पूर्णपणे उपभोग पध्दतीचा त्याग करुनच आसक्तीविरहित जीवन जगण्यास सुरुवात करणे.
(१६) अंत्येष्टी – हा मनुष्य जीवनातील शेवटचा संस्कार आहे .अंत्यविधी हा व्यक्तीच्या मरणानंतरच सुरु होतो. व त्यात – मृत आत्म्याच्या सर्व भल्या,बु-या वासनांचा क्षय करुन त्याला योग्य सद्गती या संस्काराद्वारेच मिळवून देणे. यालाच – अंत्येष्टी विधी म्हणजेच दशक्रिया,श्राद्ध ,पिंडदान,उत्तरक्रिया केल्या जावून त्या मृत जीवास योग्य त्या सद्गतिची विधीयुक्त तयारी केली जाते अशा प्रकारे मनुष्य जीवनात या सोळा प्रकारच्या संस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे.

ज्योतिष महामहोपाध्याय,प्रा. पंडित हिंगे,
अमरबाग,सोसायटी हडपसर,पुणे ४११०२८.

 

pc:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu