सोने खरेदी करताना …
सोने खरेदी करताना घ्यावयाची काळजी ..
सोने खरेदी करणे हा आपल्याकडे बहुतेकांच्या आवडीचा विषय असतो. स्त्रियांच्या तर हा विशेष जिव्हाळ्याचा विषय. बाजारात आपण सोने खरेदी करतो तेव्हा काही गोष्टी ग्राहक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. ग्राहकांची होणारी फसवणूक आणि आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी त्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.सोने खरेदी करताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी हे आपण आज जाणून घेणार आहोत.
सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यावर हॉलमार्कचे निशाण आहे की नाही हा सर्वात पहिला निकष असावा. हॉलमार्क म्हणजे सोन्याची शुद्धता आणि त्याच्या क्वॉलिटीची भारत सरकारने प्रमाणित केलीली मान्यता आहे हॉलमार्क सोबत लिहिलेल्या नंबर वरून तुम्ही त्या सोन्याची क्वॉलिटी देखील पारखू शकता. त्यावर ७५० हा आकडा असेल तर सोने हे १८ कॅरट क्वॉलिटीचे आहे, ९१६ हा आकडा असेल तर सोनं हे २२ कॅरट क्वॉलिटीचं आहे.अनेकदा सोनार १८ कॅरटच्या सोन्याला २२ चा सांगून तुमची फसवणूक होऊ शकते. दागिन्यांवर बनलेल्या हॉलमार्कच्या मुख्य ४ माहिती असतात.
पहिले म्हणजे त्रिभुजची निशाणी,
सोनं किती कॅरटचे आहे तो नंबर,
दुकानदाराचा लोगो आणि
हॉलमार्किंग सेंटरचा लोगो .
कुठल्याही सोन्याचा दागिना विकत घेताना ह्या चार गोष्टी नक्की तपासून घ्या.
शुद्धतेनुसार कॅरेट असतात
24 कॅरेट- 99.9
23 कॅरेट–95.8
22 कॅरेट–91.6
21 कॅरेट–87.5
18 कॅरेट–75.0
17 कॅरेट–70.8
14 कॅरेट–58.5
9 कॅरेट–37.5
कॅरेट गोल्डचा अर्थ असतो 1/24 टक्के सोने. दागिने 22 कॅरेटचे असतात. 22 ला 24 ने भागून 100 ने गुणाकार करा.
(22/24)x100 = 91.66 म्हणजेच तुमच्या दागिन्यांसाठी वापरण्यात आलेल्या सोन्याची शुद्धता 91.66 टक्के आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर टीव्ही किंवा प्रसार माध्यमांमध्ये 50 हजार रुपये असेल आणि तुम्ही बाजारपेठेत सोने विकत घेण्यासाठी गेलात तर (50000/24)x22= 45833 रुपये दर लागेल. कारण दागिने 22 कॅरेट सोन्यापासून तयार होतात. यात मजुरीही जोडली जाते. अशा वेळी किंमत आणखी वाढते.
सोने विकत घेताना पक्के बिल तयार करुन घ्या. त्यात किती कॅरेटचे सोने आहे, बाजारभाव कोणता घेतला आहे, मजुरी किती लावली आहे , GST किती लावला आहे ते तपासून घ्या.
pc:google