लग्न समारंभासाठी व्हा झटपट तयार !

लग्न समारंभाचा हंगाम जवळ येऊ लागला आहे. मग आता महिन्याभरावर आलेल्या घरातल्या किंवा खास मैत्रिणीच्या लग्नासाठीची खरेदी , तयारी याच बरोबर बारीक दिसणे , छान दिसणे ह्यासाठीची तयारी देखील सुरु होते. आज आपण या थोडक्या काही आठवड्यात बारीक दिसण्यासाठी कशी काळजी घ्यावी हे बघूया.    
आंख खुले तब सवेरा  या म्हणीला अनुसरून २-४-६ जे काही आठवडे उरले असतील त्यांचा पुरेपूर उपयोग करून घ्या 
१. रोज सकाळी उठून सर्वप्रथम एक फळ किंवा एक मोठी वाटी पपई घ्यावी. तसेच लिंबू, मीठ ,चिमूटभर दालचिनी पूड घालून कोमट पाणी घ्यावे. ह्यामुळे शरीराला डिटॉक्सिफिकेशन आणि क्लेनझिंग व्हायला मदत होते. 

२. व्यायामाला कमीत कमी १ ते २ तास रोज देणे जरुरीचे आहे. चालणे , पोहणे , नाच करणे , सूर्यनमस्कार घालणे, सेल्फ बॉडी वेट एक्सरसाइज इ. प्रकार बारीक होण्यासाठी फार उपयोगी ठरतात. 

३. व्यायामाप्रमाणेच पोषक अन्न देखील महत्वाचे असते. त्यामुळे योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि योग्य कॉम्बिनेशनचे अन्नघटक शरीरात जाणे महत्वाचे आहे. बारीक होण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे , फॅड डाएट करणे शरीराला घातक  ठरू शकते. अनेकदा यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स किंवा नंतर अचानक खूप वाढलेले वजन असे दुष्परिणाम पाहायला मिळतात. 
त्यामुळे उपाशी राहू नका दर दोन तीन तासांनी एखादे फळ, ताक किंवा सूप किंवा अगदीच कामात असाल तर २-४ मल्टिग्रेन  बिस्किट्स नक्की खा. हे झाले मिड मिल चे. 
४. सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण यात सर्व पोषकतत्व जाणे गरजेचे आहे. त्यामुळे यावेळी चौरस आहार घ्या. ज्यात 
  – कार्बोहायड्रेट आणि फायबरसाठी धान्यापासून बनलेले काहीतरी जसे पोहे , रवा , भाकरी , चपाती , कॉर्नफ्लेक्स ,        व्हीटफ्लेक्स इ. 
  – प्रथिनांसाठी शेंगदाणे , कडधान्ये , डाळी, अंडी , मासे , दही , ब्रोकोली सारख्या खूप प्रथिन असणाऱ्या भाज्या , ड्रायफ्रुटस. 
  – जीवनसत्वे , खनिजे मिळण्यासाठी पालेभाज्या , फळे , विविध कोशिंबिरी, सलाड इ. चे योग्य कॉम्बिनेशन घ्यावे. 
  – योग्य प्रमाणात तेल , तूप देखील शरीरासाठी गरजेचे आहे त्यामुळे ते बंद करू नये. त्याचे दुष्परिणाम दिसायला वेळ लागत नाही. 
  – अन्नाबरोबरच पाणी देखील तितकेच महत्वाचे आहे. रोज कमीतकमी ३ लिटर आणि जास्तीतजास्त ५ लिटर पाणी प्यावे. 
  – रोज किमान ७-८ तास झोप गरजेची असते. याच काळात शरीर डागडुजीचे काम करत असते. त्यामुळे योग्य झोप मिळेल याची काळजी घ्या. 
  – दुधीचा रस शरीरासाठी उत्तम तो आठवड्यातून २-३ वेळा घेतला तर तुमचे ध्येय गाठण्यात फार मदत होईल. 
  – आहारातील फळांचे प्रमाण वाढावा त्यामुळे शरीराला गरजेचे पोषकतत्व मिळतात पण कॅलरीज फार जात नाहीत. ह्याचा वजन कमी करणे , बारीक होणे या ध्येयपूर्तीसाठी  फार उपयोग होतो. 
  – जंकफूड ,बाहेरचे खाणे, तळलेले पदार्थ या काळात बंद करा. या खाण्यात पोषकतत्व कमी आणि कॅलरीज खूप जास्त असतात त्यामुळे वजन वाढणारे हे पदार्थ तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करतात – जर बाहेर जाण्याची वेळ आलीच तर सलाड , सँडविच ,किंवा ग्रील, उकडलेले किंवा बेक केलेले पदार्थ किंवा हमस पिता ब्रेड अशा गोष्टींना प्राधान्य द्या. 
  – याचबरोबर वजन आणि इंच कमी करण्यासाठी अनेक उपचारपद्धती असतात, ह्यातील खरोखर काम करणारी , काहीही दुष्परिणाम नसणारी उपचार पद्धती तुम्ही केलीत तर तुमचे ध्येय तुम्ही अगदी सहज गाठू शकाल.              

– Dr. Asmita Sawe.
Homeopath, Nutritionist, Acupressure therapist & Reiki master.
Managing Director, Rejoice Wellness Pvt. Ltd.
PC : Google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu