सप्तपदी मी रोज चालते …

लग्न म्हणजे समाजाने निर्माण केलेली व्यवस्था, जिथे स्त्री आणि पुरुष कायदेशीररीत्या धार्मिक विधींसह कायमसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. पण खऱ्या अर्थाने सांगायचे झाल्यास लग्न म्हणजे सामाजिक , आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या स्वतंत्र वातावरणात वाढलेल्या दोन घराण्यांतील व्यक्ती एकत्र येऊन त्यांनी जन्मभर एकत्र राहण्याचा केलेला विलक्षण प्रयोग !
सप्तपदीनंतर विवाह संस्कार पक्का आणि अपरिवर्तनीय होतो. हा विधी करताना यज्ञवेदीच्या भोवती सात पाटांवर प्रत्येकी एक अशा तांदळाच्या लहान लहान राशी मांडलेल्या असतात. प्रत्येक राशीवर सुपारी ठेवलेली असते. होमाग्नी अर्ध्यदानाने प्रज्वलित केला जातो. पुरोहिताचा सतत मंत्रोच्चार चालू असताना वधूवर यज्ञवेदीभोवती प्रदक्षिणा घालतात. तसे करताना वर वधूचा हात धरून पुढे चालतो. वधू तांदळाच्या प्रत्येक राशीवर प्रथम उजवे पाऊल ठेवते आणि त्याच प्रकारे सर्व राशींवर पाऊल ठेवून चालते. प्रत्येक पदन्यासाचा स्वतंत्र मंत्र उच्चारला जातो. त्यानंतर ते दोघे होमाग्नीस तूप आणि लाह्या अर्पण करतात. सप्तपदीनंतर वधू-वर अचल अशा ध्रुवतार्‍याचे दर्शन घेऊन हात जोडून नमस्कार करतात. विवाहबंधनाचे आजन्म चिरंतन पालन करण्याच्या प्रतिज्ञेचे हे प्रतीक होय.
सप्तपदी : सप्तपदी :या विधीमध्ये वाधुसमावेत सात पावले टाकताना वराच्या वधूच्या संबंधी अपेक्षा, तसेच तिच्या विवाहोत्तर कर्तव्यांची जाणीव याचे दिग्दर्शन आहे .

१) हे रमणी, संसाराची मधुर स्वप्ने तुझ्या इच्छेप्रमाणे साकार होत असताना,जीवनात काही खटकले तर सहनशीलतेची जोपासना कर.सर्वाना आनंदी ठेवण्याचे कर्तव्य तू यशस्वीपणे पार पाड.
२) हे सौभाग्यकांक्षिणी आज तुझ्या सौभाग्याची सुरवात आहे.काळाचा अल्लडपणा उद्या चालणार नाही.हे दुसरे पाऊल उचलताना एका वेगळ्या जबाबदारीची जाणीव तुझ्या मनात जन्म घेउदे.
३) हे गृहिणी हे तिसरे पाऊल उचलताना एक गोष्ट लक्षात ठेव,केवळ तू आणि तुझे पती म्हणजे सारा संसार असे समजू नकोस. व्यवहारी जीवनातही यशस्वी होईल असा आत्मविश्वास बाळग.
४) हे गृहलक्ष्मी सुखी संसारात मनसोक्त विहार करण्याची वेळ येईल तेंव्हा सासू,सासरे,दीर,नणंदा,जावा घरात असताना अनेक मोहाचे क्षण तुला आवरले पाहिजेत.संसाराची शोभा आहोरात्र टिकवली पाहिजे.
५) हे भाग्यलक्ष्मी,स्त्रीने स्वतः करिता कधीच काही मागितले नव्हते.पतीला देव समजून तोच आनंदाचा ठेवा मागून त्यात तिने आनंदाचा क्षण मानला पाहिजे.तुही त्याच स्त्रीत्वाच्या गुणाची जोपासना कर.
६) हे स्वामिनी,तुझे पती हे तुझे केवळ सहप्रवासी नह्वेतर सोबतीसुद्धा आहेत.तूला कानात हळूच सांगावेसे वाटते पुरुष फार लबाड असतात,तेंव्हा त्यांच्या मनाचा ठाव घेऊन त्यांचे मन विचलित होऊ न देण्याचा काटेकोरपणे प्रयत्न कर.
७) हे मातृदेवते,तुझ्या स्त्रीत्वाची सांगता होण्याचा काळ आता जवळ आला आहे यावेळेस जीवनातील ७वे पाऊल उचलताना संसाराच्या वेलीवर उमलत असणारया कळीत सुगंध आणि सौंदर्य भरण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu