कवितेचे पान – वाचकांच्या लेखणीतून
कविता
बदल
कधी त्याच त्या गोष्टींचा कंटाळा येतो
मग बदल आपल्याला खुणावू लागतो
आपण असं करू, तसं करू
विचारचक्र होत सुरू
कधी स्वत: निर्णय घेतो
वा इतरांच मत आजमावतो
शेवटी मनाप्रमाणे घडते
हवा असला बदल घडतो
बदल हे घडतच असतात,
जागतिक परिस्थितीत
समाजव्यवस्थेत,अर्थव्यवस्थेत
जीवनपद्धतीत,कार्यपद्धतीत
कधी काळाची गरज म्हणून
बँकिंग सेवेत बदल व बदली अपरिहार्य
कधी दूर परराज्यात बदली होते
मग आपले धाबे दणाणते,नंतर
तेथील भाषा,चालीरिती समजून घेतो
आणि हा बदलही गोड मानून घेतो
For a change(बदल) घराबाहेर
पर्यटनाला,Longdriveला जातो
नातेवाईक,मित्रांना जाऊन भेटतो
बदल बराचसा सुखावह असतो
काहीवेळा अन्यायदायी वाटतो
(उदा. इंधन/शुल्क दरवाढ)
बदलल्या परिस्थितीशी
जुळवून घेणे,अंगवळणी पडणे
त्याचा भाग बनून जाणे
म्हणजे बदल स्वीकारणे
विनायक वैद्य
गंगोत्री हौसिंग सोसायटी फ्लॅट ५
बिबवेवाडी रस्ता pune-४११०३७
मोबाईल- ८४४६७७५८१५
छटा प्रेमाच्या
प्रेम पवित्र असत तरल असत
प्रेम शाश्वत असत सत्य असत
प्रेम भावना असत साधना असत
प्रेम अर्चना असत मनोकामना असत
प्रेम आविष्कार असत साक्षात्कार असत
प्रेम हुंकार असतं झंकार असत
प्रेम गहीर असत गहिवर असत
प्रेम सुरुवात असतं रुजवात असत
प्रेम आंधळ असतं डोळस असत
प्रेम निखळ असत निरागस असत
प्रेम लाघवी असतं निगर्वी असत
प्रेम निर्व्याज असतं आर्जवी असत
प्रेम खट्याळ असतं थोडं चहाटळ असत
प्रेम खोडकर असतं थोडं वेंधळ असतं
प्रेम गुलाबी पत्र असतं मायेच छत्र असत
प्रेम स्फुरण असतं प्रियजनांचे स्मरण असत
प्रेम असत झुरणं एकमेकांसाठी मरण
प्रेमात आर्त ओढ असते
थोडी घालमेल असते
प्रेम एक उमलणारी पाकळी असते
प्रेजीवांना जोडणारी साखळी असते
प्रेम हृदयाची भाषा असतं
प्रेम नजरेची भाषा असत
प्रेम स्पर्शाची भाषा असतं
प्रेमाला वयाचं बंधन नसतं
ते आत्म्याआत्म्याचं मंथन असतं
विनायक वैद्य
गंगोत्री हौसिंग सोसायटी फ्लॅट ५
बिबवेवाडी रस्ता पुणे-४११०३७
Mobile- ८४४६७७५८१५
pc:google