चला जंगल सफारीला – ताडोबा , पेंच

चला जंगल सफारीला – ताडोबा , पेंच 

ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प

जंगलाच्या मध्यभागी असलेले ताडोबा आणि तेलीयाचे निळेशार जलाशय, पायाखाली जाणवणारी पानगळीची रेलचेल, ठायी ठायी आढणारे वन्य प्राणी.. श्वासाला चिरत जाणारी नीरव शांतता आणि ऊंच आकाशाला आपल्या कवेत घेऊ पाहणारे आणि दाटीवाटीने उभे असलेले हिरवेगार वृक्ष… ताडोबा-अंधारी प्रकल्प म्हणजे “जंगलच्या राजा” चे साम्राज्य. तांबड्या मातीवरून चालत जात असतांना जागोजाग जाणवणारी उत्कंठा आपल्याला शांत राहू देत नाही. आपली नजर सतत शोध घेत असते पाणवठ्यावर जाणवणाऱ्या हालचालीचा.. हा कानोसा घेत असतांनाच जर “वाघोबां”चे दर्शन झाले तर अंगावर उभे राहिलेले रोमांच आणि तो थरार बरंच काही सांगून जातो…ताडोबा, ३१ मार्च १९५५ रोजी घोषित झालेले हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान. त्याचे क्षेत्रफळ ११६.५५ चौ.कि.मी. भोवताली ५०९.२७० चौ.कि.मी चे जंगल असल्याने २५ फेब्रुवारी १९८६ रोजी हा सर्व परिसर संरक्षित होऊन अंधारी प्रकल्पाची निर्मिती झाली…ताडोबा नॅशनल पार्क (११६.५५ चौ. कि.मी.) आणि अंधारी वन्‍यजीव अभयारण्य (५०८.८५ चौ.कि.मी.) असे एकूण ६२४.४० चौ.कि.मी. परिसरात जिल्‍हा चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान आहे. मूळच्‍या आदीवासी लोकांचा देव तारू आणि अंधारी नदी मुळे या अभयारण्याला वरील नाव पडले. हे मुख्यत: बांबू (गवत) साग, मोह, अर्जुन, तेंदू, बेहडा, जांभुळ, अशा अनेक प्रकारच्‍या वृक्षांनी समृध्द असे जंगल आहे. १९९५ मध्ये ताडोबा हे संरक्षीत व्‍याघ्र प्रकल्‍प म्‍हणून घोषित केले गेले. ताडोबा हे Land of the Tiger म्‍हणून ओळखले जाते.ताडोबा अभयारण्यातील वन्‍यजीव विविधता:
४५ प्रकारचे सस्‍तन (Mammals) ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी(Reptiles)
२८० प्रकारचे पक्षी (Birds)
९४ प्रकारची फुलपाखरे (Butterflies)
२६ प्रकारचे कोळी (Spiders)
‘निसर्ग टूर्स’च्या वतीने तज्ज्ञांच्या मदतीने  १२ एप्रिल  ते १४  एप्रिल २०२३ आणि  १५ मे ते १७ मे २०२३  दरम्यान या जंगल सफारीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

पेंच राष्ट्रीय उद्यान (मध्यप्रदेश-नागपूर)
वन्यजीव निरीक्षण सफारी

दिनांक : २६ एप्रिल  ते  २८ एप्रिल २०२३
    २९ मे ते ३१ मे २०२३

प्रिय दर्शीनी पेंच व्याघ्र प्रकल्प असे नाव  असलेले परंतु पेंच नदीमुळे या उद्यानाला पेंच व्याघ्र प्रकल्प असे नाव रूढ़ झाले आहे. या जंगलाची व्‍याप्‍ती एकूण ७५८ चौ.की.मी. आहे. त्यातील २५७.२६ चौ.की.मी कोअर एरिया असलेले हे जंगल मध्य प्रदेशातील छींदवाडा व सिवनी या जिल्ह्यातील सीमेवर व १० भाग महाराष्ट्रात आहे हे जंगल मुख्यत: एैन, हळदु, तेंदु, हिरडा, अमलताश अशा अनेक प्रकारच्या वृक्षांरी समृद्ध असे जंगल आहे. रुडयार्ड कीपलींगनी पेंच व्याघ्र प्रकल्प आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरा मुळेच जंगल बुक हे पुस्तक लिहीले आहे. पेंच अभयारण्यातील वन्यजीव विविधता :
३३ प्रकारचे सस्‍तन (Mammals) १५ प्रकारची फुलपाखरे (Butterflyes)३० प्रकारचे सरपटणारे प्राणी (Reptiles) १६४ प्रकारचे पक्षी (Birds)पेंच अभयारण्यातील वन्यजीव :वाघ, बिबटे, जंगली कुत्रे, अस्वल, चिंकारा, नीलगाय आणि सांबर असे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत.

‘निसर्ग टूर्स’च्या वतीने तज्ज्ञांच्या मदतीने २६ एप्रिल  ते  २८ एप्रिल २०२३ आणि  २९ मे ते ३१ मे २०२३  दरम्यान मध्य प्रदेशातील या जंगल सफारीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
WEBSITE : www.nisargtours.net 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu