तृतीय पारितोषिक | ‘मागणं’-ज्योति देशपांडे

‘मागणं’     

 “एकच मागणं देवा आता तुझ्यापाशी

  देऊ नकोबुद्धी मला सतत मागायची अशी

  ‘प्रयत्नांती परमेश्वर’ म्हणतो आम्ही मारे

  परी विनवतो ‘विनायास माझे भले करसारे’

  त्यास्तव येतो वारंवार तुझिया  दाराशी.

  एकच मागणं  देवा – – – – – – – – –             (१)

 

   इच्छापूर्तीसाठी करतो आम्ही उपास तापास

  प्रार्थितो तुला ‘सत्वरी दूर कर माझा त्रास’

  त्यासाठीच मस्तक ठेवितो तव चरणाशी

  एकच मागणं देवा – – – – –             (२)

 

  “बढती दे , पैसा दे ,पास कर मला

  हे होवो,ते होवो,नैवेद्य चढवेन  तुला”

  युक्ती ही लढवितो आम्ही नेहमी खाशी

  एकच मागणं देवा – – – – –             (३)

 

   “हे मात्र देवा खरंच शेवटचं मागणं

  नाही वाजवणार परत ‘हवंहवंचं तुणतुणं

  प्रयत्नातच पाहीन तुला, ठरवलंय मनाशी

  एकच मागणं  देवा   आता तुझ्यापाशी

   देऊ नकोस बुद्धी मला सतत मागायची अशी

   देऊ नकोस बुद्धी मला सतत मागायची अशी”

 

  – ज्योति देशपांडे.    
    Jyoti Utgikar Deshpande
    पुणे.
    तृतीय पारितोषिक (कविता)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu