ब्रायडल मेकअप

लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण असतो. ज्यांचे लग्न असते, त्या मुलासाठी आणि मुलीसाठी तो दिवस खूप वेगळा आणि खास असतो. त्यामुळे इतरांपेक्षा आपला लुक वेगळाच असावा, असे त्यांना वाटते. विशेषतः मुली लग्नासाठी खास तयारी करतात; पण बऱ्याच मुलींना लग्नासाठी तयारी करताना काय काळजी घ्यायची, हे माहीत नसते. त्याची योग्य ती माहिती आधीच मिळवली, तर लग्नाच्या वेळी गडबड होत नाही.

 

लग्नाच्या दिवशी केल्या जाणा-या नवरीच्या मेकअपमध्ये रासायनिक सौंदर्यसाधनांचा वापर जास्त केला जातो. त्याचा त्वचेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे लग्नाच्या दिवशीचा मेकअप करताना काही काळजी घेणे गरजेचे असते. लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री झोपताना चेह-यावर ५ ते १० मिनिटं बर्फ चोळावा. नंतर चेहरा पुसून चेह-यावर गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने साबण न वापरता स्वच्छ धुऊन घ्यावा आणि कोरडा करून घ्यावा. त्यानंतर बटाट्याची साल काढून त्याचे छोटे काप करून त्याची पेस्ट करावी, या पेस्टचा लेप चेह-यावर १० मिनिटे लावावा.
चेह-याचा मेकअप करताना आजकाल सर्वांत जास्त वापर होतो तो फाऊंडेशनचा. पण फाऊंडेशन लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन त्वचेनुसार क्रीम लावून घ्यावी. तेलकट त्वचा असेल तर मॉईश्चरायझर असलेल्या क्रीमचा वापर न करता डड्ढाय क्रीम वापरावे. कोरडी त्वचा असेल तर मॉईश्चरायझरचा वापर करावा. त्यामुळे फाऊंडेशन चेह-यावर सगळीकडे नीट पसरते.
फाऊंडेशनच्या वेगवेगळ्या शेड्स उपलब्ध असतात. त्वचेच्या रंगाला जुळणा-या छटेचा वापर करावा. त्वचेचा रंग सावळा असेल तर जास्त फाऊंडेशनचा वापर करण्याऐवजी अगदी कमी प्रमाणात लावावे. नाहीतर चेहरा पांढरट दिसू शकतो. लग्न सोहळ्यात गर्दी आणि खूप तीव्रतेच्या लाईट्सचा वापर केल्यामुळे घाम येऊन चेह-यावरील फाऊंडेशनचं तेज कमी कमी होत जातं. अशा वेळी त्या वातावरणात फाऊंडेशन टिकून राहण्यासाठी फाऊंडेशन लावण्यापूर्वी चेह-याला बर्फ चोळावा. शक्यतो फाऊंडेशन लावताना हाताऐवजी स्पंजचा वापर करावा. चेह-यासोबत मानेला आणि पाठीलाही फाऊंडेशन लावून घ्यावे.
फाऊंडेशन लावून झाल्यावर त्यावर कॉम्पॅक्ट पावडर लावावी. फाऊंडेशनने त्वचा तेलकट दिसू लागते. ती पुन्हा कोरडी दिसण्यासाठी कॉम्पॅक्ट लावावा. फाऊंडेशनप्रमाणेच कॉम्पॅक्टच्याही शेड्स उपलब्ध असतात. त्यातील आपल्या त्वचेच्या रंगाशी मिळत्याजुळत्या रंगाच्या शेडची निवड करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu