एप्रिल महिन्यात आयोजित होतोय अनोखा ऑनलाईन प्रॉपर्टी एक्स्पो – २५ ते ३० एप्रिल २०२२

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बहुतांश जाहीर कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे बहुतांश उद्योग-व्यवसायांनी ऑनलाइनची वाट धरली. मात्र, घर खरेदी-विक्रीसाठी अशाप्रकारे काही ऑनलाइन व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हती. त्यातही मुंबई उपनगरांसाठी तर अजिबातच अशी काही सोय नव्हती. या पार्श्वभूमीवर पार्लेबझार डॉट कॉमच्यावतीने अनोख्या अशा डिजिटल मेगा प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.

25 ते 30 एप्रिल 2022 दरम्यान www.onlinepropertyexpo.in या वेबसाइटवर सदर अनोख्या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये मुंबईसह पुणे, नाशिक अशा विविध विभागांतील मान्यवर डेव्हलपर्स आपल्या प्रॉपर्टीज, वेगवेगळे प्रोजेक्ट्स प्रदर्शित करणार आहेत. यामध्ये वेगवेगळ्या गृहप्रकल्पांबरोबरच सेकंड होम ऑप्शन्स, लँड, प्लॉट्स, इंटिरिअर डिझायनिंग, घरांसाठीचे कर्ज अशा गोष्टींचेही वेगवेगळे पर्याय येथे असणार आहेत.

या एक्स्पोच्या माध्यमातून एक्झिबिट करणार्‍यांनाही खूप कमी किंमतीत भरपूर लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि त्यांना आपल्या बद्दलची माहिती सहजपणे ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. यामध्ये डेव्हलपर, कन्सल्टंट, आर्किटेक्ट, इंटिरिअर डेकोरेटर, फायनान्स आदींसह प्रॉपर्टीशी निगडित इतर विविध सेवांचा समावेश असणार आहे, त्यामुळे घरांची खरेदी-विक्री करू इच्छिणार्‍या दोन्ही गटांनी पार्लेबझार डॉट कॉमच्या या विशेष प्रॉपर्टी एक्स्पोचा लाभ घ्यावा असे आवाहन या डिजिटल एक्स्पोच्या आयोजिका चंदा मंत्री यांनी केले आहे.

हा एक्स्पो अटेंड करण्यासाठी www.onlinepropertyexpo.in या साइटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. तेथे नोंदणी केल्यानंत हॉल्स या पेजवर आपण रिअल इस्टेट प्रोजेक्टस्, कन्स्लंटट, अलायइड प्रोडक्टस् अ‍ॅण्ड सर्व्हिस, लोन्स अ‍ॅण्ड फायनान्स, सेकंड होम आदी विविध पर्याय आहेत. त्यावर क्लिक करून त्यातील सेवा पाहता येणार आहेत. या विविध पेजवर क्लिक केल्यानंतर संबंधित विषयाशी निगडित सविस्तर माहिती आणि प्रोजेक्टसची तसेच कंपनीची माहिती, फोटो, व्हिडिओज् आदी पाहता येणार आहेत. त्याचप्रमाणे संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीसोबत त्याचवेळी ऑनलाइन संवाद देखील साधता येणार आहे.

या एक्स्पोमध्ये प्री रजिस्टर केल्यास एक्स्पोबद्दलची माहिती, अपडेट्स वेळोवेळी कळविण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक जणांनी यामध्ये आपली नोंदणी करावी असे आवाहन पार्लेबझार डॉट कॉमच्या संचालिका चंदा मंत्री यांनी केले आहे.

pc:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu