वास्तूवर ग्रहांचा प्रभाव © बबनराव पाटील

आपल्या आयुष्यातील चांगले वाईट दिवस (काळ) बघण्यासाठी सामान्य माणूस मुख्यतः ज्योतिषाकडे जात असतो.

भविष्यकालीन अज्ञानाचा पडदा उघडून न बघता आपण रोजचे जीवन जगत असतो. कुठल्या क्षेत्रात आपली प्रगती आहे आपण केव्हा कुठे चांगली प्रगती करून यशस्वी किर्तीवान होऊ. आपले वाईट दिवस (काळ) आपण कसे कमीत कमी त्रासाने घालवू, त्यात कशी कमीत कमी ग्रहांची पीडा आपल्याला होईल त्यासाठी काय उपाय करावे इ.ज्ञान मिळण्यासाठी त्यासाठी माणूस ज्योतिषाकडे जातो. भावी काळाच्या उज्ज्वल जीवनाच्या आशेनेच तर माणसाला या धकाधकीच्या जीवनात जगण्यासाठी दिलासा मिळतो. एकूणच काय तर भविष्यकालीन आरशात डोकावण्याची सर्वांनाच आवड असते. त्यामुळे आपल्या वाईट काळात आपली संपत्ती, (पैसा) आरोग्य व प्रतिष्ठा आपण वाचवू शकतो. या जगात सर्व काही गमावण्यापेक्षा निदान (शहाणपणाने) आपले अर्धे सौख्य गमावून केवळ या ज्योतिष्याच्या आधारेच सावधतेने जगू हे निश्चितच खरे आहे. अंकशास्त्रीय (Numerology) दृष्टीकोनातून आपण आपल्या जन्म तारखेनुसार आपले मित्र अंक व आपले शत्रू अंक जाणू शकतो.

 वास्तू : 

आपण हे नीट लक्षात ठेवावे की, वास्तुशास्त्र म्हणजे तोडफोड शास्त्र नव्हे. हे एक उत्तमशास्त्र आहे. ज्याच्यामुळे माणूस आपले जीवन जास्त समृध्दतेने शांतपणे व सुख समाधानाने व्यतीत करू शकतो. (Peace  Prosperity Harmony & Health) भारतातच फक्त आठ दिशांना  वेगवेगळी नावे आहेत. उदा. अग्नी तत्त्वाला ईशान्य तर पृथ्वी तत्त्वाला नैऋत्य (राक्षसाच्या नावावरून नैऋत्य हे नाव पडले.) आपल्या घरातील  आठ दिशांचा योग्य उपयोग करून संपूर्ण घराचा (आपल्या वास्तुच आपण छान उपभोग घेऊ शकू.

ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून तुमचा वास्तुयोग तुमच्या पत्रिकेतील  चतुर्थ स्थानातील ग्रहांवर अवलंबून असतो. ग्रहस्थितीप्रमाणे तुमचा  वास्तुयोग तुम्हास कळू शकतो.

समजा चतुर्थ स्थानात खालीलप्रमाणे ग्रह असतील तरः

• रवि: रवि हा अग्नी तत्वाचा ग्रह. हा चतुर्थस्थानात असल्यास साधारणतः वडिलोपार्जित वास्तू असण्याची शक्यता असते अथवा मोठी  वास्तू असते.

• बुध : बुध हा लहान ग्रह ज्या ग्रहासमवेत असतो त्याप्रमाणे तो फल देतो. साधारण लहान वास्तू असण्याची शक्यता असते. पत्रिकेत बुध चांगला असेल तर लाकडी फर्निचर जास्त असते. बुध जर पत्रिकेत बिघडला असेल तर घराचे प्लास्टर खराब असते.

• शुक्र : शुक्र हा ग्रह सौंदर्याचा, भौतिक सुखाचा कारक असतो. हा ग्रह चतुर्थात असल्यास वास्तुसंबंधीचे व्यवहार सहज होतात. वास्तू सुशोभित असते तसेच घरात सौंदर्याच्या वस्तू असतात.

• चंद्र : चंद्र हा मनाचा कारक ग्रह असता चांगली वास्तू मिळते. घराच्या जवळ स्वच्छ पाण्याची विहीर, पाण्याची टाकी (मुन्सिपालटीची मोठी टाकी) असते. नदी किंवा समुद्र असतो व या सर्व गोष्टी नोकरीच्या ठिकाणी असतात.

• शनि : ग्रहमालेतील मंद गतीने एकाच ग्रहात अडीच वर्षे रहाणारा हा ग्रह आहे. दीर्घ मुदतीने वास्तू प्राप्त होते म्हणजेच स्वतःचे घर होणे. मुळात कठीण वास्तू असल्यास ती जुनाट किंवा सेकंडहेंन्ड असते. तिच्यातील फर्निचर जुनाट पुरातन काळचे, त्यातील चित्रे पौरात्य पुरातन असतात. कायमस्वरुपी लक्षात रहाणाऱ्या घटना घडविणारा असा हा ग्रह असतो.

• मंगळ : मंगळ हा ग्रह भूमीकारकग्रह चतुर्थात असता साधारणतः २८ ते ३२ वर्षापर्यंत स्वकर्तृत्वावर वास्तू होण्याची शक्यता असते. घरातील वातावरण नरम-गरम (तापट) असण्याची शक्यता जास्त असते.

राहू- केतू :  हे ग्रह नसून छायाबिंदू आहेत. साधारणतः हे ग्रह बिघडले असता वास्तू शापीत असते. वास्तू स्मशानाजवळ असते किंवा स्मशानावरच वास्तू असते.  स्वतःचे घर होणे कठीण जाते.  केतू इतर पाप ग्रहांच्या फलामध्ये चारपटीने वाढ करतो यासाठी या घराची नवग्रहशांती किंवा राहू केतूची होम-हवन करून शांती करावी.

नेपच्यून: नेपच्यून असता घराजवळून गावाचा मोठा नाला किंवा सांडपाणी दलदल असते. घराजवळ नर्सिंग होम असते. 

 

वास्तुमार्गदर्शक

©बबनराव पाटील
०९८२१३१८५५२
09821318552

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu