समाज मनाच बोन्साय झालंय का?

मध्यंतरीच्या काळात बोन्सायच्या सजावटीचे महत्व खूप वाढले होते. झाडांना सुंदर सुंदर आकार द्यायचे आणि त्याची वाढ खुंटवायची, एका विशिष्ट उंचीपर्यंतच ते वाढू द्यायचे मग त्याचा घर,हॉटेल,दवाखाना,सभागृह आशा विविध ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी वापर करायचा.हा व्यवसायही बऱ्या पैकी चालत होता.पण हे जे बोन्साय चे फॅड आले तेव्हापासूनच माझ्या मनात चलबिचल सुरू झाली होती.एखाद्या गोष्टीची होणारी नैसर्गिक वाढ या अनैसर्गिक पध्दतीने खुंटवायची हे काही पटण्यासारखे नाही.पण विचार करता असे जाणवले की ही वाढ थांबवणे, खुंटवणे फक्त झाडांच्याच बाबतीत नाही तर लहान मुलांपासूनच सुरू होते.लहान बाळाला काय कर, हे कर, असं कर हे सांगण्याऐवजी हे नाही करायचे,असे नाही, अ ह नको नको असे नकारच शिकवले जातात.एक प्रकारे मानवाचे बोन्सायात रुपांतराची सुरवात होते. लहान मुलांची जिज्ञासा, प्रयोगशील वृत्तीलाच प्रतिबंध घातला जातो आणि एखाद्या प्राण्याच्या पायात बेड्या घातल्या की त्याला जशी सवय होते तशीच सवय या लहान मुलांना लागायला लागते.

अर्थात अपवाद असले तरी प्रमाण नगण्य आहे. लहान मुलांची हुशारी, सतत प्रश्न विचारण्याची सवय किंवा नाविन्य जाणण्याची उत्सुकता या सर्व गोष्टीना पुरे पडण्यास एकतर आईवडिलांना वेळ नसतो किंवा आवड नसते अथवा त्याबद्दल पुरेसे ज्ञान नसते.त्यामुळे ते मुलांच्या बौद्धिक वाढीचे बोन्साय व्हायला कारणीभूत ठरते.पण पालकांचा सहवास मुलांना न मिळणे, संस्कार न होणे आणि पालकांचेच अनुकरण करत मुले वाढणे म्हणजे बोन्सायच.कारण स्वतंत्र विचारशक्ती करण्याची कुवतच ही मुलं हरवून बसतात. स्वार्थी वृत्ती, आपमतलबीपणा वाढतो.सामाजिक भान, राजकीय परिणाम, देशहित,राष्ट्रहीत या सर्वांबाबतीत अनभिज्ञ राहतात किंवा ह्या विषयांचे महत्वाच वाटत नाही. या सगळ्यांची आता तीव्रतेने जाणीव होते कारण जगभरात हा:हा: कार माजवलेल्या कोरोनामुळे.

आपले प्राण पणाला लावून काम करणारे पोलीस, डॉक्टर्स ,नर्सेस,वॉर्डबॉय,आया,सफाई कामगार, किराणा दुकानदार, भाजीवाले कित्ती म्हणून अत्यावश्यक सेवा देणारे मायबाप आहेत.पण त्यांना सहकार्य न करणारा वर्ग मात्र काही शिकलेले म्हणून सुशिक्षित म्हणवणारे तर काही समाजकंटक एवढेच काय नगरसेवक आणि धनदांडगे या लोकांना विषयाचे,परिणामांचे गांभीर्यच नसावे याचा खेद वाटतो. मन विषणण होते अशा बातम्या ऐकून, घटना बघून म्हणून मला त्यांचे मन, भावना बोन्साय केल्या आहेत असे म्हणावेसे वाटते.

काय शिकलो आपण ह्या lock डाऊनच्या काळात? आपल्या गरजा किती अल्प आहेत आणि आपण मानवता सोडून फक्त मी -माझे या भोवतीच पिंगा घालतोय.पैशाची श्रीमंती दाखवण्याची चढाओढच लागलेली असते.तेथे सहिष्णूता,सहानुभाव याला थाराच नसतो, आणि आज मात्र एवढे वैभव असूनही केव्हा, कोणाला कोरोना होईल हे सांगता येत नाही,तेव्हा अशांच्या पोटात गोळा येतोय. या एकवीस दिवसांत किंवा कोरोनाच्या दिवसात विचारमंथन करायला वेळ मिळेल अशी भावनाच जागृत न होता धडाधड व्हाट्स aap, फेसबुकवर काय काय करता येईल याची आयतीच यादी मिळाली म्हणजे पुन्हा स्वतः ला एकतर विचार करायची सवय लागली नव्हती आणि लागणार किंवा विचार करावा म्हटले तरी समाजमाध्यम करू देत नाही. त्यांच्याच डोक्याने तुम्ही चाला हेच ठसवताय मनावर.

एखादी गोष्ट मिळाली नाही तर नैराश्य येतंय आताच्या युवकांवर. एव्हढी कमकुवत झालंय मन.व्यसनांच्या आहारी गेलेय लोकं. व्यसनं म्हणजे फक्त दारू-गुटखाच नव्हे तर टी. व्ही.,मोबाइल, इंटरनेट, नेटफ्लेक्स,यातली एखादी गोष्ट मिळाली नाही तर शीट यार करत नर्व्हस होतेय ही पिढी.या तरुनांबरोबरच बऱ्याच घरातील जेष्ठ नागरिकांनाही दूरदर्शन ने जखडून ठेवले आहे. त्यामुळे संवाद खुंटला आहे. म्हणून मी माणसांच बोन्साय झालंय असे म्हणते.आता तरी स्वतंत्र पणे विचार करा.आपल्या विचारांच छोटंसं रोपटं आपल्या मनात पेरा.त्याला समाधनाच , विचारमंथनाच खतपाणी घाला.त्या विचारांच सुंदर फळ देणारा वटवृक्ष तयार होईल अशी आशा करायला काय हरकत आहे.आपणच आपल्या विचारांना पालवी फोडुया.

अर्चना कुलकर्णी
9820423949

pc: google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu