ठिपक्यांच्या रंगतदार रांगोळ्या – २०२०

रांगोळी म्हणजे भूमी अलंकरण. भूमीला सजवण्यासाठी , देव्हारा , भोजनाची पंगत , अंगण , शुभकार्य स्थळ इ.जागा सुशोभित करण्यासाठी शंखजीऱ्याची  भाजून केलेली पंढरी पूड , तांदुळाची पिठी, खडू इत्यादी साहित्याने काढलेल्या विविध चित्राकृतींना  रांगोळी असे म्हणतात. त्यात रंग भरून ती अधिक आकर्षक बनवली जाते. 

रांगोळीत रंग भरताना : काही टिप्स 
प्रथम रंगसंगती ठरवावी मग त्यानुसार रंग भरावेत.
१. एकाच रंगातील अनेक शेड किंवा २.विरुद्ध रंगाच्या जोड्या  उदा. लाल : हिरवा , पिवळा : जांभळा 
एक रंग जर फिकट वापरला तर त्याशेजारी गडद रंग वापरावा. दोन भडक रंग जवळ वापरू नयेत.
रांगोळीत अनेक रंग वापरण्या ऐवजी २-३ रंग वापरावेत आणि त्या रंगांच्या फिकट व गडद छटा वापराव्यात. 
रांगोळी काढण्यापूर्वी रांगोळी चाळून घ्यावी .जाडी भरडी रांगोळी वापरू नये.
रांगोळीची रेष ही  अत्यंत काटेकोर व नाजूक यायला हवी तरच ती रांगोळी रेखीव दिसते.

रंग कसे तयार करावेत :
पिवळा +हिरवा = पोपटी 
हिरवा +काळा = काळसर हिरवा 
लाल +पिवळा = केशरी 
नारिंगी +रांगोळी = बदामी 
तांबडा +पिवळा +काळा = तपकिरी 
तांबडा +निळा = जांभळा 
रांगोळ्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ठिपक्यांच्या रांगोळ्या आणि संस्कार भारती रांगोळ्या यांचा जास्त वापर होतो.
खाली काही सोप्या रांगोळ्या तुमच्यासाठी दिल्या आहेत.

ठिपक्यांच्या रांगोळ्या – २०२० 

११ ठिपक्यांची रांगोळी 

 

११ ठिपक्यांची रांगोळी 

 

१५ ठिपक्यांची रांगोळी 

 

१८ ठिपक्यांची रांगोळी 

 

८ ठिपक्यांची रांगोळी 

 

कमळाची रांगोळी 

Main Menu