रीडर्स डायजेस्ट © मुकुंद कुलकणीं

5 फेब्रुवारी 1922 – शंभर वर्षं पूर्ण होत आहेत आज या अभिरुची संपन्न मासिकाला . कालानुरूप आज हे डिजिटल फॉर्ममध्ये उपलब्ध आहे . जेंव्हा आजच्या सारखा माहितीचा विस्फोट झाला नव्हता तेंव्हा Authentic माहिती मिळवण्याचा विश्वसनीय स्त्रोत होता रीडर्स डायजेस्ट . आजही आपल्या या ब्रीदाला जागून आहे रीडर्स डायजेस्ट .
आपल्या Official website वर About us मध्ये रीडर्स डायजेस्ट ने व्यक्त केलेले मत
” अक्षरशः ” खरे आहे !
” In this era of information overload , Reader’s Digest offers something unique : the very best advice , information and inspiration from multiple sources , condensed into an easy-to-read digest . In each issue you’ll get trusted , time – saving insights about Health , Personal Finance , Work , Family , National issues PLUS exclusive book excerpts , news making interviews , and humour .”
इ . स . 1922 आजच्या दिवशी डेविट वॉलेसनी रीडर्स डायजेस्टची सुरूवात केली .

सुरुवातीपासूनच रीडर्स डायजेस्टनी आपला उदारमतवादी दृष्टिकोन कायम ठेवला आहे . राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर रीडर्स डायजेस्ट अँटी कम्युनिस्ट पंथातला आहे .

इ . स . 1929 पर्यंत रीडर्स डायजेस्टचे वर्गणीदार दोन लाख नव्वद हजार पर्यंत पोचले होते . आणि आर्थिक प्राप्ती नऊ लाख अमेरिकन डॉलर्स प्रतिवर्ष एवढी होती . पहिली अंतरराष्ट्रीय आवृत्ती 1938 मध्ये इंग्लंड मध्ये प्रसिद्ध झाली . चाळीसाव्या वर्धापनदिनापर्यंत रीडर्स डायजेस्टच्या चाळीस अंतर राष्ट्रीय आवृत्त्या 13 भाषेतून प्रसिद्ध होत होत्या आणि आणि खप होता दोन कोटी तीस लाख प्रती .
कित्येक दशके रीडर्स डायजेस्ट प्रत्येक अंकात तीस आर्टिकल्सच्या स्वरुपात प्रसिद्ध होत होता . Amusing anecdots , Personal glimpes , Humor in uniform आणि Life in these united states या सदरांसहित World power हा कॉलम पहिल्यांदा जानेवारी 1945 च्या आवृत्तीत प्रसिद्ध झाला . 2002 ते 2006 रीडर्स डायजेस्ट शब्दसंग्रह ( vocabulary ) प्रतियोगीता घेत असे . Readers Digest National World Power challenge . चीनमध्ये रीडर्स डायजेस्ट 2008 साली पोचले .
सुरूवातीला रीडर्स डायजेस्ट वर्षातून 10 आवृत्त्या या स्वरुपात निघत असे . आता वर्षाला 12 प्रत्येक महिन्याची एक अशा प्रकारे प्रसिद्ध होते .
अंतरराष्ट्रीय आवृत्यांनी रीडर्स डायजेस्टला जगभरात Best selling monthly journal चा बहुमान प्राप्त करून दिला आहे . सध्या रीडर्स डायजेस्ट 49 आवृत्त्या आणि 21 भाषात प्रसिद्ध होत आहे . रीडर्स डायजेस्ट 70 पेक्षा जास्त देशात उपलब्ध होते . 1954 पासून रीडर्स डायजेस्टची भारतीय आवृत्ती इंग्लीशमध्ये प्रसिद्ध होते . तेंव्हा त्याचा खप 40000 प्रती एवढा होता . बरीच वर्षे रीडर्स डायजेस्टचे प्रकाशन टाटा गृप ऑफ कंपनीजने केले . सध्या रीडर्स डायजेस्टचे प्रकाशन लिव्हिंग मिडिया इंडिया लिमिटेड करते आणि त्याचा खप सहा लाख प्रती दरमहा एवढा आहे . इंडिया टुडे च्या खालोखाल भारतात जास्तीत जास्त वाचले जाणारे रीडर्स डायजेस्टच आहे .

रिडर्स डायजेस्ट ब्रेल , डिजिटल , ऑडिओ अशा विविध स्वरूपात प्रसिद्ध होते . मोठ्या फॉन्टमधील रिडर्स डायजेस्ट लार्ज प्रिंट आवृत्तीही प्रसिद्ध होते . रिडर्स डायजेस्टचा आकार , सर्वसाधारणपणे अमेरिकेत प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांच्या निम्म्याने आहे , म्हणून इ.स. 2005 च्या उन्हाळ्यात अमेरिकन एडिशनचे स्लोगन होते , ‘ America in your pocket . ‘ जानेवारी 2008 ला ते ‘ Life well shared . ‘ असे बदलण्यात आले .

सध्या मात्र रिडर्स डायजेस्टच्या भारतीय आवृत्तीची लोकप्रियता घटते आहे असे दिसते . इ.स. 2009 साली इंडिया टुडे खालोखाल रिडर्स डायजेस्टच भारतातील सर्वाधिक खपाचे लोकप्रिय नियतकालिक होते . इ.स. 2017 ला त्यात घसरण होऊन ते नवव्या क्रमांकावर गेले . इ.स. 2019 च्या सर्वेक्षणानुसार आता ते टॉप टेन मधेही नाही . इशानी नंदी सध्या रिडर्स डायजेस्टच्या भारतीय आवृत्तीच्या संपादक आहेत .

पहिले संपादक लीला बेल वॉलेस आणि डेविट वॉलेस हे होते .

सामान्य ज्ञानात मोलाची भर घालणारे रीडर्स डायजेस्ट आजही वाढत्या वयातल्या मुलांना आवर्जून वाचायला देण्यासारखे आहे

रीडर्स डायजेस्टच्या पहिल्या अंकाचे तसेच फेब्रुवारी 2022 च्या भारतीय आवृत्तीचे मुखपृष्ठ . रिडर्स डायजेस्ट पुन्हा लोकप्रिय होवो या सदिच्छा !

© मुकुंद कुलकर्णी
9421454888
pc: google 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu