नवीन वर्षात… नवीन घरात…
जगभर कितीही फिरलो, तरी घरासारखा आपलेपणा आणि उब कुठेच सापडत नाही. घर ही केवळ वास्तू नसून ते आपलं एक छोटंसं जगंच असतं; त्यामुळे आजच्या या झपाट्याने बदलणाऱ्या युगात आपलं घर सुखसोयींनी परिपूर्ण असावं, असं प्रत्येकालाच वाटतं. म्हणूनच आपल्या राहणीमानाला नवनवी परिमाणं जोडणारं ‘रिअल इस्टेट’ हे क्षेत्र समाजाच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक समजलं जातं. नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहकांच्या गरजेनुसार अत्याधुनिक सुविधा यामुळे हे क्षेत्र सतत प्रगतीपथावर असतं. ”
नवीन वर्षात… नवीन घरात..” या सदरात, आपण रिअल इस्टेट क्षेत्रातील नवनवीन प्रकल्प, सेकंड-होम ऑप्शन्स, स्मार्ट होम, इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा, नामांकित बिल्डर्स आणि त्यांच्या प्रकल्पांची वैशिष्ट्ये, रिअल इस्टेट क्षेत्रातील नवनवीन ट्रेंड्स आणि गुंतवणुकीच्या संधींविषयी माहिती घेणार आहोत. त्यामुळे आपल्या स्वप्नातील घराच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हे सदर नक्कीच एक उत्तम आणि विश्वासार्ह मार्गदर्शक ठरू शकेल. आपल्या पहिल्या सदरात आपण नाशिकमधील आघाडीचे बिल्डर रवी महाजन यांच्या कामाविषयी जाणून घेणार आहोत. त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी नाशिक शहराच्या रिअल इस्टेट क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. ग्राहकांच्या गरजा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल साधत, त्यांनी उच्च दर्जाच्या गृहनिर्मिती प्रकल्पांची उभारणी केली आहे. त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आणि प्रकल्पांचा आढावा या लेखातून घेऊया…. ….’घर’..या शब्दातच एक प्रकारचा जिव्हाळा आहे. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्या भावना, अनुभव आणि अनेक आठवणी दडलेल्या असतात. त्यामुळे आपलं स्वतःचं असं एक घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. घरखरेदी हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा निर्णय; त्यामुळे सहाजिकच हा निर्णय घेताना अनेक घटकांचा विचार करावा लागतो.आज तंत्रज्ञानामुळे घरांच्या डिझाईन आणि सुविधांमध्ये आमूलाग्र बदल झाले असून, अत्याधुनिक घरांची मागणी वाढली आहे. नाशिकसारखं ऐतिहासिक शहरही प्रगतीशील शहरीकरणामुळे आधुनिक जीवनशैलीचं केंद्र बनलं आहे. उच्च दर्जाच्या लक्झुरी घरांसाठी अनेक प्रकल्प उभारले जात आहेत. यात रवी महाजन यांनी वास्तुकलेला नवा दृष्टिकोन दिला असून, नाशिकच्या आधुनिकतेला नवी ओळख मिळवून दिली आहे..

रवी महाजन बिल्डर्स आणि डेव्हलपर्स हे नाशिकच्या झपाट्याने बदलणाऱ्या आणि आधुनिक जीवनशैलीच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव आहे. गेल्या ३२ वर्षांपासून बांधकाम उद्योगात सातत्यपूर्ण यश मिळवत, त्यांनी ७० हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि ३००० हून अधिक कुटुंबांना नवं घरकूल देऊन विश्वासाचा भक्कम पाया रचला आहे. आज नाशिककडे पाहताना प्रत्येकजण या शहराच्या प्रगतीचं कौतुक करतो. विमानसेवा, देशातील महत्त्वाच्या शहरांशी जोडणारे रस्ते, आय.टी. पार्क आणि पंचतारांकित हॉटेल्स यामुळे नाशिकची ओळख बदलत आहे. मात्र, अशा स्पर्धात्मक काळात बांधकाम उद्योगात स्वतःचं नाव उंचावणं हे नक्कीच कठीण आहे. रवी महाजन यांनी हे आव्हान स्वीकारत ग्राहकांच्या गरजा आणि स्वप्नांची पूर्तता करत नाशिकच्या प्रगतीत आपला मोलाचा वाटा दिला आहे. ग्राहकांच्या गरजांची बारकाईने जाण ठेवत, गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता, त्यांच्या अपेक्षांना प्राधान्य देणं ही रवी महाजन यांची खासियत आहे. स्वतः सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे त्यांनी प्रत्येक प्रकल्पातील छोट्या-मोठ्या घटकांवर लक्ष ठेवून, बांधकामाचा दर्जा उंचावला आहे. साईटवरील कामकाज समजून घेणं, समस्यांवर उपाय शोधणं, आणि तिथल्या टीमसोबत काम करणं हा त्यांचा रोजचा दिनक्रम असतो. रवी महाजन यांनी निवडलेली प्रत्येक जागा आणि डिझाइन ही भविष्यातील गरजांचा विचार करून तयार केली गेली आहे. फक्त घरंच नाहीत, तर आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली संपूर्ण जीवनशैली देणं हा त्यांचा उद्देश आहे. विशेष म्हणजे आज त्यांना त्यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांची मुलं आणि सुनबाई देखील खांद्याला खांदा लावून मदत करत आहेत. तसंच, रवी महाजनांचा प्रामाणिक आणि कुशल कर्मचारी वर्ग कायमंच कामाची गुणवत्ता आणि वेळेचं काटेकोरपणे पालन करत आला आहे. ‘रवी महाजन बिल्डर्स आणि डेव्हलपर्स’ हे केवळ घरे उभारत नाहीत, तर ग्राहकांच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देतात. नाशिकच्या प्रगतीसोबत सुसंगतपणे वाटचाल करत त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या आनंदवन (काठे गल्ली), अमृतधारा (इंदिरानगर), आणि अँटोनिया (आर. डी. सर्कलजवळील ४ व ५ बी.एच.के.) यांसारख्या प्रकल्पांना आज ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. या प्रकल्पांविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
आनंदवन:

आनंदवन हा नाशिक मधील त्रिकोणी गार्डनजवळ, शांत आणि रम्य ठिकाणी उभारलेला एक भव्य प्रकल्प आहे, जो अत्याधुनिक सुखसोयींनी परीपूर्ण आहे. त्यामुळेच हा प्रकल्प या परिसराची नवी ओळख बनत आहे. रोजच्या गरजांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या प्रकल्पात 2 आणि 3 बीएचके स्पेशिअस लक्झुरी फ्लॅट्स सर्वसामान्यांना सहज परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. बस स्टॉप, रिक्षा स्टँड, द्वारका स्टॉप, मुंबई-आग्रा हायवे, पुणे हायवे, रंगूबाई जुन्नरे हायस्कूल, पोद्दार स्कूल, नामांकित रुग्णालये, पंचवटी, तपोवन, आणि रेल्वे स्टेशन ही महत्वाची ठिकाणं देखील काही मिनिटांच्या अंतरावर आहेत. या प्रकल्पात सुंदर, प्रशस्त घरांसोबत मुलांसाठी खेळण्याची जागा, नेट क्रिकेट, पार्टी लॉन, क्लब हाऊस, इनडोअर गेम्स, ग्रीन जिम, मल्टिपर्पज कोर्ट, सुरक्षा केबिन, आणि पुरेसे पार्किंग यांसारख्या 22 पेक्षा जास्त सुविधा आहेत. या प्रोजेक्टसाठीचे सॅम्पल फ्लॅट्स तयार असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9145220222 / 9011076019
अमृतधारा :

अमृतधारा : इंदिरानगरची शोभा वाढवणारा ‘अमृतधारा’ हा प्रकल्प देखील आधुनिक जीवनशैलीला अनुकूल आहे. इंदिरानगर हे सुसंस्कृत, सुशिक्षित व संस्कारी क्षेत्र आहे. महत्त्वाचं म्हणजे आज इंदिरानगर कॉलेज रोड आणि गंगापूर रोडशी बरोबरी करत आहे. शॉपिंग मॉल, सुपर मार्केट, शाळा, कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेज, सतत फेऱ्या करणाऱ्या बस व रिक्षा, पेट्रोल पंप, फूड जॉइंट्स, रुग्णालये यांसारख्या सुविधा येथे सहज उपलब्ध आहेत. इथून राजसारथी सोसायटी 700 मीटरवर, तर डिमार्ट मेगा मॉल आणि अशोका मेडिकेअर स्टार हॉस्पिटल 500 मीटर अंतरावर आहेत. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, औद्योगिक नगरी किंवा शहरातील कोणत्याही भागात जाण्यासाठी हे ठिकाण अतिशय सोयीचे आहे. अमृतधारा हा 2 आणि 3 बीएचके फ्लॅट्स देणारा 14 मजली 7 टॉवर प्रकल्प आहे, जो सुरक्षित गेटेड कम्युनिटी आणि 25+ आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. येथे नाना-नानी पार्क, जिम्नॅशियम, ॲम्फीथिएटर, जॉगिंग ट्रॅक, क्लब हाऊस, बॉक्स क्रिकेट नेट, बास्केटबॉल रिंग, डेकोरेटिव्ह लॉबी, गार्बेज शूट, व्हिडिओ डोअर फोन, आणि सुरक्षा केबिन यांसारख्या जीवनावश्यक सोयी उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7304730483 / 7304730487
अँटोनिया :

अँटोनिया : सद्गुरु नगर, गोविंदनगर, आर.डी. सर्कलजवळ, सिटी सेंटर मॉल लिंक रोडवर उभारलेला अँटोनिया हा रवी महाजनांचा सुपर लक्झुरीअस 4 आणि 5 बीएचके फ्लॅट्सचा प्रकल्प आहे. लक्झुरीची व्याख्या बदलणारा आणि शहराची शान वाढवणारा हा प्रकल्प कोणालाही पाहता क्षणी भुरळ पाडेल असा आहे.सर्व बाजूंनी मोकळे आणि प्रकाशमान फ्लॅट्स तुम्हाला नैसर्गिक प्रकाश व ताज्या हवेसह आरामदायी आणि सकारात्मक वातावरणाचा अनुभव देतील. येथे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सुपर लाईफस्टाईल ॲमेनिटीज तुम्हाला आयुष्यभर आनंद आणि समाधान देतील. स्वतःचा बंगला बांधण्याचा विचार बाजूला ठेवून, या प्रकल्पात गुंतवा, जो तुम्हाला केवळ निवासच नव्हे तर एक प्रतिष्ठित जीवनशैली देईल. हा प्रकल्प तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त लक्झुरीअस सुविधा व सुरक्षा देईल तसेच तुमचे स्टेटस सिंबॉल ठरेल……जर तुम्हाला रवी महाजन यांच्या अशा इतरही प्रकल्पांविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर त्यांच्याशी थेट संवाद साधू शकता. तुम्हाला त्यांच्या विविध ठिकाणांवरील प्रकल्पांची सर्व वैशिष्ठ्ये, उपलब्ध सुविधा आणि खरेदी प्रक्रियेबद्दल सुस्पष्ट माहिती मिळेल. त्यांचं विस्तृत ज्ञान, अनुभव आणि मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या घराची निवड करण्यात निश्चितच उपयुक्त ठरेल. त्यामुळे आजच रवी महाजन बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या भविष्यातील गृहखरेदीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाका.
अधिक माहितीसाठी : www.ravimahajan.com