स्वयंपाकघरातील पदार्थ आणि मसाले वापरून वाढवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती

ज्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली तो मनुष्य सुदृढ. तो कोणत्याही आजारापासून, कोणत्याही इन्फेक्शनपासून . स्वतःचा बचाव करू शकतो. पण सध्याच्या धावपळीच्या जगात आपलं आपल्या आहाराकडे आणि शरीराकडे दुर्लक्ष होऊ लागलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमी होत चालली आहे. म्हणूनच सध्या जगात आजारांचे आणि रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. परंतु आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आणि मसाले असतात की ज्यांच्या वापराने आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती अतिशय उत्तम बनवू शकतो. तेव्हा आपल्या आहारात या गोष्टींचा समावेश करा आणि सुदृढ राहा. बघुया तर या गोष्टी कोणत्या आहेत…

आलं
आल्यामध्ये असलेल्या अँटी इंफ्लेमेटरी  गुणांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते .सर्दी ,खोकला, घसा दुखणे यांच्यासारखे आजार लगेच बरे होऊ शकतात .चहा मध्ये आलं, मध, लिंबू घालून प्यायला किंवा आल्याच्या तुकड्यावर सैंधव मीठ आणि लिंबाचा रस घालून जेवणासोबत खाल्लं तरीही त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो.

लिंबू
 लिंबामध्ये क जीवनसत्व  भरपूर प्रमाणात असते तसेच लिंबा मध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी फंगल चे गुण असतात . त्यामुळे आहारात रोज लिंबाचा भरपूर वापर केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यास नक्कीच मदत होते.

लसूण
लसूण आपल्या रोजच्या आहारात नक्कीच समाविष्ट करावा कारण लसणामध्ये अलायसिन नावाचा तत्व असतं. जे आपल्याला संसर्ग आणि जिवाणूंपासून वाचवत.
सर्दी ताप यावर लसूण हा उत्तम उपाय आहे ज्या व्यक्तींना ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांनीही रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या पाण्यासह घेतल्या तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो.

मध
मधाला अमृतच म्हणावं लागेल. आयुर्वेदामध्ये मधाचे खूप फायदे सांगितलेले आहेत. मध हे एनर्जी बूस्टर सुद्धा आहे .हृदयरोग रक्तदाब ,अस्थमा ,ताप सर्दी खोकला एलर्जी सर्वांवरती मध खूप उपयुक्त ठरतं.

काळी मिरी
काळी मिरी मध्ये अँटीबॅक्टरियल गुण असतात आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं .त्यामुळे शरीरातले टॉक्सिन्स किंवा विषदव्य बाहेर टाकण्यासाठी काळ्या  मिरीचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो.

हळद
हळद ही निसर्गतः जंतुनाशक आहे. आणि रोगास प्रतिबंध करण्याचे सारे गुण हळदीमध्ये आहेत त्यामुळे रोजच्या आहारात हळदीचा नियमित वापर केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

दही
दही सुद्धा आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप उत्तम अन्न आहे. दह्यामध्ये  मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, कॅल्शियम आणि जीवनसत्वे  असतात.  आणि त्यात झिंकही असतं. झिंकच प्रमाण आपल्या शरीरात जर कमी झालं तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. दह्यात असलेल्या चांगल्या जिवाणूमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते.

हिंग
हिंगामध्ये अँटीइंफ्लेमेटरी , अँटिबायोटिक आणि अँटिव्हायरस हे तीनही गुण आहेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे कोणत्याही पदार्थाच्या फोडणीत हिंगा शिवाय ती फोडणी अपूर्णच म्हणता येईल.

आवळा
आवळ्यामध्ये  जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे .  जीवनसत्त्वाचा प्रमुख स्त्रोत असंही आवळ्याला म्हणता येईल यामुळे आपली इम्युन सिस्टीम एकदम मजबूत होते. रोज सकाळी नियमितपणे आवळ्याचा रस घेतला आणि थोडा मध घातला तर अनेक आजारांपासून आणि त्यांच्या प्रसारापासून आपले संरक्षण होते.

ओवा
रोज एक चमचा ओवा पाण्यात उकळून प्यायल्याने ताप, आजार, इन्फेक्शन पासून दूर राहता येते.
पोटात दुखत असेल अपचन झाले असेल तर ओवा खाल्ल्याने आराम मिळतो.

टोमॅटो
टोमॅटोमुळे लायकोपेन शरीरातील फ्री रॅडिकल्स ना न्यूट्रलाइज करतात आणि कॅन्सर पासून बचाव करतात. टोमॅटो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करतो.

ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवण्यासाठी ग्रीन टी हाही उत्तम उपाय आहे. तसेच यामध्ये पॉलीफिनोल्स असतात त्यामुळे फ्लूच्या जंतूंचा नाश करण्यास मदत होते.

लवंग
लवंगांमध्ये असलेल्या क जीवनसत्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते तसेच लवंगा दात व घशाचे  इन्फेक्शन ही कमी करण्यास मदत करतात.

गाजर
गाजरामध्ये ही अँटिऑक्सिडंट भरपूर असतात शिवाय याच्यात अ जीवनसत्व असतं आणि गाजर हे कॅरोटीनाईडचं उत्तम स्त्रोत आहे.

दालचिनी
दालचिनी मध्ये अँटीफंगल , अँटीबॅक्टरियल असे वेगवेगळे गुण आहेत ज्यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शनची लढता येते. दही ,सॅलेड यामध्ये किंवा चहामध्ये दालचिनी पावडर घालून घेता येते .घसा खवखवत असल्यास चिमूटभर दालचिनी पावडर घेऊन त्यावर पाणी प्यावे खोकला असल्यास मधात दालचिनी पावडर मिसळून घ्यावे. खोकला बरा होतो.

तुळस
तुळस ही सगळ्यात आरोग्यदायी असल्याने आपण तिची पूजाही करतो. तुळशीमध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टरियल आणि हे गुण आहेत. सर्दी ,खोकला यासारखे आजार तुळशीमुळे बरे होतात तुळशीच्या पानांचे  सेवन केल्यास संसर्ग होत नाही तसंच तुळशीच्या पानांचा काढा करून प्यायलास बराच फायदा होतो.

पालक
पालकांमध्ये लोह ,कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं तसंच पालक आणि हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्व क खनिज फॉलिक ऍसिड आणि फायबरचे गुण असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंटही असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपण निरोगी राहतो. नवीन पेशींचा निर्माण आणि डीएनए दुरुस्त करण्यासाठी ही पालक मदत करतो म्हणूनच याला सुपरफुड असे म्हणतात.

बदाम
बदामा मधल्या  जीवनसत्वामुळे आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढते . त्यात रायबोफ्लेवीन  आणि नायसिन असतं त्यामुळे आपण तणाव मुक्त राहण्यास मदत होते.

डाळिंब
डाळिंबामध्ये जीवनसत्व फॉलिक ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट अशा अनेक प्रकारच्या गुणांमुळे कॅन्सर पासून डाळिंब आपलं संरक्षण करते.

राईचे तेल
राईच्या तेलामध्ये भरपूर मॅग्नेशियम असतं त्यामुळे अस्थमा आणि सर्दी पासून आराम मिळतो. त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यांना श्वासाचे आजार किंवा सर्दीची समस्या आहे त्यांनी राईच तेल गरम करून त्यात लसूण किंवा सैंधव मीठ टाकून छातीवर चोळलं तर त्याचा आराम मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu