आहार हेच औषध

 शरीर हे ईश्वराचे मंदिर आहे . आपण  मंदिराच्या स्वच्छतेची काळजी घेतो . ते सुंदर ठेवणे   हे पवित्र काम आहे .तसेच शरीर स्वरछ ठेवणे  हे आपले पहिले कर्तव्ये  आहे. निरोगी  शरीर हे ईश्व्व्रराच्या  निवासासाठी ; म्हणूनच  योग्य स्थान आहे. त्या शरीरची काळजी, निगा, देखभाल बाहेरच्या  व्यक्तीकडून करून घेणे हे निसर्गनियमांच्या  विरुद्ध आहे. ‘हिपोक्रेटस’  हे आधुनिक औषध शास्त्राचे  पिता समजले  जातात.त्यंनी म्हटले आहे,”रोगाचे निवारण निसर्ग करतो, चिकित्सक  नव्हे.” याचे प्रत्यंतर आपल्या पूर्वजांच्या  जगण्यातून येतेच. ते दीर्घायुषी  होते. कारण यांचा  आहार साधा होता. याउलट  आज आपल्या आहारात खूप मसालेदार  पदार्थ,  तिखट,तळलेले ,प्रक्रियायुक्त आणि गोठवलेले खाद्य पदार्थांचा  वापर  खूप वाढला  आहे. या चुकीच्या आहारामुळेच  प्रकृतीत विकृती निर्माण होते. शरीरात विविध आजारांची वाढ होते.  

निरोगी रहायचे  असेल  तर प्रत्येकाने नैसर्गिक  साधा शाकाहार, कच्च्या फळभाज्या ,फळे, मोड आलेली कड धान्ये खाल्ली पाहिजेत.  
आहारामुळे  आपले रक्त  निर्माण होते. निर्माण झालेले रक्त शरीरभर  पसरते , शुध्द बनते .  योग्य आहारासोबत साधनेची  जोड दिल्यास  रक्तातील विष द्रव्य  शरीराबाहेर पडण्यास मदत होते. आपल्या साठी समतोल,पोषक, सात्विक आहार हेच उत्तम औषध आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीस मानवेल अशा पद्धतीने  आहार घेतल्यास  , आनंदी जीवनाच्या वाटचालीस  खूप मदत होऊ शकते. 

आपले शरीर अनेक पेशींनी बनलेले आहे. या पेशींची  वाढ अन्नातील निरनिराळ्या  घटकांतून  होत असते.  अन्न  शरीरास  आवश्यक असलेले इंधन पुरवीते. शरीराची हालचाल करण्यासाठी शक्ती लागते . ही  शक्ती आहारातून खालेल्या अन्नातून मिळते.  शरीरावर वेगवेगळे आघात होत असतात . त्यांना तोंड देण्यासाठी  शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते. हि अन्नातील काही घटकांमुळेच मिळत असते.  
 शरीर निरोगी राहण्यासाठी योग्य आहाराची गरज असते . योग्य आहार कोणता , हे आपणास  अनुभवने  ठरविता येते. भूख लागल्याची अंत:प्रेरणा आपल्याला  सूचना करते. जेवले पाहिजे.

जेवण्याची  एक वेळ असते. ती वेळ जवळ आली की भूक लागते. आपल्या घरात दररोज स्वयंपाक होतो.    दुपारी बारा वाजता जेवायचे असले  की , दोनेक  तास अगोदर तयारी करावी लागते तीच  प्रक्रिया आपल्या शरीरात होत असते. समजा बारा वाजता जेवायला बसतो हे शरीरास माहीत  असते. मेंदूकडून दोन तास अगोदर सूचना सुटते. जठरात वेगवेगळे पाचक रस आणि एन्झाइम्स  तयार होऊन लागतात. जेवल्या नंतर ते अन्न जठरात येते. तिथे हे पाचक रस आणी एन्झाइम्स अन्नात मिसळतात. जठराच्या आकुंचन प्रसरणाने ते अन्नात मिसळून पचनास मदत होते.  जेवणा  नंतर सर्वसाधारणपणे  तीन तासांपर्यंत  ही पचन क्रिया चालू असते. त्यानंतर ते खालील आतड्यांत  उतरते. ठरलेल्या वेळी  आपण जेवलो नाही तरी जठरात सवयीने   पाचक रस तयार होते.अर्ध्या  तासाने तो खालील आतड्यांत उतरतो. अवेळी जेवल्याने  जठरात जेव्हा अन्न येते, त्या वेळी तिथे पाचक रस नसतो. या वेळी मेंदूकडून सूचना मिळते. पाचक रस तयार करा. ही  प्रक्रिया होई पर्यंत  दोन तास लागतात. पाचक रस तयार होतो. त्या वेळी अन्न् जठरातून  खाली सरकते. अन्न पुढे पाचक रस मागे असा स्थितीत अपचन होते. पित्त होते म्हणून ठरलेल्या वेळी जेवणे आवश्यक आहे.
 
दिवसातून दोन वेळेस जेवणे उत्तम आहे. आपला जठाराग्नी प्रज्वलित  झाला कि, त्यात आहुती दिली पाहिजे. ती योग्य आहाराची आहे .आपण अन्न खातो. या खाल्लेल्या  अन्नात संस्कार  होतात. अनेक पाचक रस मिळून अन्न पचते. त्यातील पोषक द्रव्ये रक्तात शोषली  जातात. हि उर्जा  असते. ज्यांना जास्त श्रमाचे काम करायचे. त्यांनी आवर्जून न्याहरी करावी.

सकाळचे जेवण बराच्या आगोदर घ्यावे . दुसरे जेवण संध्याकाळी  घ्यावे . दुपारचा  वेळ पित्ताचा कालावधी  आहे. संध्याकाळी पित्ताचा कालावधी कमी  आसतो. रात्री उशिरा पचन नीट होत नाही. कारण रात्री एन्झाइम्स  तयार होत नाहीत.म्हणून  सायंकाळी ७:०० च्या आत जेवावे. रात्री १० वाजता भूक  लागते. ती भूक  खोटी असते. या वेळी ग्लास भर पाणी  प्यावे.
सकाळी   १०:०० ते १०:३० ला जेवल्यास  दुपारी भूक  लागते. या वेळी  फळ खावे. फळ हे उत्तम नैसर्गिक  अन्न आहे. ते पचायला  उत्तम आहे. जड अन्न सकाळी घ्यावे . सायंकाळी हलका आहार घ्यावा.                                                                         

किती खायचे ?                      

आपण जेवलो कि ते अन्न जठरात जाते आणि जठराची आकुंचन आणि प्रसारण प्रक्रिया सुरु होते. पोटभर जेवल्याने हि क्रिया नीट होत नाही. त्या करिता जठरात थोडी जागा शिल्लक ठेवावी लागते. या साठी साधा नियम असा आहे. अर्धे पोट अन्नाने भरावे. पाव भाग द्रव्य आहार घ्यावा. यात तक पाणी येईल. उर्वरित चौथा हिस्सा हवेसाठी मोकळा सोडवा. त्यामुळे पचन नीट होण्यास मदत होते . ढेकर येईपर्यंत जेऊ नये. ढेकर आली याचा अर्थ होतो कि उरलेला भाग ही आपण अन्नानेच भरला आहे. 

कोणता आहार घ्यावा ?

नैसर्गिक आहार हेच जीवनदायी अन्न आहे. हजारो वर्षांपूर्वी माणूस निसर्गात राहत होता. निसर्गातील कंदमुळे ,कच्चे अन्न खात होता. कालांतराने अग्नीचा शोध लागला. तो अन्न भाजून अथवा शिजवून खाऊ लागला. ही प्राचीन परंपरा आहे. कच्च्या अन्नात अधिक पोषक घटक असतात. अन्न शिजवल्याने अन्नातील पोषक तत्वांचा नाश होतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी शिजवलेल्या अन्नाबरोबरच कच्च्या अन्नाचा समतोल आहार घेतलात तर नक्कीच आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.                                                                                                                

  संदर्भ  पुस्तक –
आपला आहार आपले औषध (आशा भांड )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu