चला सुंदर दिसूया …
Beauty Industry खरं तर जगातली मोठी इंडस्ट्री. आपण छान दिसावं असं बायका, पुरुष अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप वाटतं.पूर्वीच्या अगदी जुन्या काळातही फुलांच्या, कवड्यांच्या माळा हातात , गळ्यात घातल्या जायच्या वेग वेगळ्या फुलांपासून पानांपासून रंग तयार करून चेहऱ्याला लावणे असे प्रकार होतेच.पण जसजसा काळ लोटत गेला तसतशा गोष्टी बदलत गेल्या आणि एका नवीन इंडस्ट्रीचा जन्म झाला ब्युटी इंडस्ट्री.
याच ब्युटी इंडस्ट्री मधला एक भाग म्हणजे मेकअप आणि हेअर केअर. एखादी जादूची कांडी फिरावी तसे मेकअप करून चेहऱ्यावरचे तेज कसे वाढवता येईल आणि त्यासाठी सध्या बाजारात काय काय नवे ट्रेंड्स आले आहेत कोणत्या प्रोडक्टची चालती आहे याची माहिती तसेच केसांची काळजी कशी घ्यावी तुम्हाला या सदरात आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या महिन्याच्या लेखात आपण बघणार आहोत केसांच्या काळजीतला सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे, मेंदी. ही मेंदी केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी,आणि काळ्या केसांवर चांदी चमकायला लागली की केस रंगवण्यासाठी कशी उपयोगी पडते तसेच मेहंदी लावून केसांना वेगवेगळा रंग छटा कशा देता येतात आणि मेंदीमुळे केसांना रंगांसोबत चमकही येते त्यांची मुळे घट्ट होतात आणि केसांच्या वाढीसाठी ती कशी पोषक ठरते हे पाहणार आहोत.
मेंदीचे औषधी गुणधर्म
. मेंदी गुणाने रुक्ष, लघू, शीत, वीर्य आणि कषाय आहे.
मेंदीच्या पानात टॅनिन, गॅलिक ऍसिड, ग्लुकोज, मॅनिटॉल वसा इत्यादी महत्त्वाचे घटक असतात.
मेंदी त्वचेला थंडावा मिळवून देते.
केसांचे मूळ बळकट करते.
केसांतील ओला व सुका कोंडा नष्ट करते.
केसांच्या मुळांना जीवनसत्त्व आणि पोषणमूल्य मिळवून देते.
केसांना नैसर्गिक चमक मिळवून देते.
थोडक्यात सांगायचे तर, मेंदीचा सौंदर्य प्राप्तीसाठी उपयोग होतोच, शिवाय केसांच्या प्रकृती स्वास्थ्य संवर्धनासाठीही उपयोग होतो. मेंदी केसांना निरोगी बनविते. आणि त्यांचे आयुष्यही वाढविते. निरोगी केस पर्यायाने सुंदर आणि सतेज दिसतात.
येथे आपण केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळे हेअर पॅक्स् बघणार आहोत.
केसांची गळती रोखण्यासाठी हेअर पॅक्स् :
तेलकट केसांसाठी:- दीड वाटी मेंदी पूड, १ वाटी -मुलतानी माती, १ वाटी लिंबू पूड आणि १ वाटी गुलाब | पूड घेऊन एकत्र करून व्यवस्थित चाळून घ्या. हे सर्व अर्धा वाटी गुलाब पाण्यात भिजवा.
सामान्य केसांसाठी- २ वाटी मेंदी पूड, पाव वाटी जास्वंद पूड आणि पाव वाटी आवळा पूड घेऊन एकत्र करून व्यवस्थित चाळून घ्या. यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिसळून मिश्रण तयार करा येते.
कोरड्या केसांसाठी:१ वाटी मेंदी पूड, अर्धी वाटी तुळस पूड आणि अर्धी वाटी शिकेकाई पूड घेऊन एकत्र करून व्यवस्थित चाळून घ्या. यामध्ये योग्य प्रमाणात दही मिसळून मिश्रण तयार करा.
केसांच्या वाढीसाठी हेअर पॅक्स् :
सामान्य केसांसाठी- १ वाटी मेंदी पूड घेऊन त्यात १ वाटी दही घालून चांगले फेटा आणि केसांना मुळापासून टोकांपर्यंत लावा.
कोरड्या केसांसाठी- १ वाटी मेंदी पूड घेऊन त्यात १ वाटी आंबट ताक घालून चांगले फेटा आणि केसांना मुळापासून टोकापर्यंत
लावा.
तेलकट केसांसाठी- १ वाटी मेंदी पूड घेऊन त्यात १ वाटी रेड वाईन घालून चांगले फेटा आणि केसांना मुळापासून टोकांपर्यंत लावा.
pc:google