आता कमवा पैसे युट्युब शॉट्स मार्फत ! 

आता कमवा पैसे युट्युब शॉट्स मार्फत ! क्रियेटर्सना यूट्यूबने दिला उत्पन्नासाठी एक नवा पर्याय.

Youtube शॉर्टस मार्फतही आता पैसे कमावता येणार .Youtube ने क्रियेटर्स ना उत्पन्नासाठी दिले हे नवे पर्याय . Youtube शॉट्स म्हणजेच एक मिनिटापर्यंत लांबी असलेले उभे व्हिडिओ तयार करून आता पैसे कमावता येतील कारण Youtube ने त्यांचा Youtube पार्टनर प्रोग्राम आता मोठ्या व्हिडिओ बरोबरच शॉर्ट करणाऱ्या क्रियेटर साठी सुद्धा उपलब्ध करून दिला आहे.
क्रिएटर म्युझिकच्या नवीन सोयीद्वारे Youtube व्हिडिओ सोबत लावण्यासाठी गाणी आणि संगीतही उपलब्ध करून दिलं जाईल ज्यामुळे क्रियेटर आणि संगीतकार या दोघांनाही उत्पन्न मिळू शकेल.
सध्या युट्युब पार्टनर प्रोग्रामचा सदस्य असणाऱ्यांनाच Youtube जाहिराती मार्फत पैसे कमवता येतात पण त्या YPP चा सदस्य होण्यासाठी तुमच्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर्स आणि गेल्या बारा महिन्यात तुमचे चार हजार पेक्षा अधिक वॉच आवर्स असायला हवेत. जे नवीन क्रियेटर्स असतात त्यांच्यासाठी हे खूप अवघड आहे .पण आता जर तुम्ही शॉट व्हिडिओ तयार करत असाल तर YPP सदस्य बनण्यासाठी तुमच्या चॅनलवर हजार सबस्क्रायबर्स आणि गेल्या तीन महिन्यात तुमच्या शॉर्ट व्हिडिओज ना एक कोटी व्ह्यूज पूर्ण झालेले असायला हवेत असं पाहायला गेलं तर हे सुद्धा कठीण आहे पण किमान वॉच आवर्स  च्या ऐवजी आणखी एक पर्याय उपलब्ध झालेला आहे. 

हा पर्याय साधारण 2023 च्या सुरुवातीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर प्रोग्रामचे सदस्य बनल्यानंतर तिथून तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 45% हिस्सा क्रिएटरला आणि 55%  हिस्सा  युट्युब कडे असणार आहे.त्याचबरोबर सुपर थँक्स , सुपर चार्, सुपरस्टिकर्स आणि चॅनल मेंबरशिप अशा पर्यायांमधून सुद्धा तुम्हाला पैसे मिळू शकतात जे थेट युट्युब व्हिडिओ पाहणाऱ्या युजर्स कडून आलेले असतील आणि त्या बदल्यात त्यांना खास स्टिकर्स किंवा चॅनलचा वेगळा कंटेंट पाहायला मिळेल यालाच YPP म्हटलं जाणार आहे.क्रिएटर म्युझिक या पर्यायामार्फत Youtube व्हिडिओ वर गाणी वापरण्यासाठीही विकत घेता येणार आहेत.  जास्त लांबीच्या व्हिडिओज मध्ये वापरण्यासाठी गाणी विकत घेता येतील आणि मग ती हव्या तेवढ्या वेळ वापरता येतील जेणेकरून कॉपीराईटची भीती राहणार नाही.पण ज्यांना संगीत विकत घ्यायचं नसेल त्यांना त्या व्हिडिओ मार्फत आलेल्या उत्पन्नातून संगीत तयार करणाऱ्या व्यक्ती किंवा कंपनी सोबत त्यांचे उत्पन्न वाटून घ्यावे  लागेल या सगळ्याची सुरुवात 2023 पासून अमेरिकेत करण्यात येणार आहे. 

– Thinkmarathi.com Team 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu