साक्षात सरस्वती” – लता मंगेशकर

*आदरांजली*

मांगल्याचा मूर्तीमंत स्वर,
षडजाची तू तान
तुझ्या स्वराने तिन्ही लोकी ये,
अद्वैताचे भान
ज्ञानेशाची अमरवाणी तू,
अंतरात उजळली
प्रभा फाकली भावभक्तीची,
संजीवनी ठरली
शुभ्र मनोरम भारतरत्न हे,
चमकत दशके आठ
प्रतिभाशाली अष्टपैलूनी
तुझे गिरवले पाठ
अमृतमयहा ज्योतीकलश तू,
साक्षात सरस्वती
सूरलयीला कवटाळीत ती,
प्रेमळ आई सती
जगास कळले साधी रहाणी,
सर्वोत्तम ती लता
साश्रू नयनी प्रेम अर्पूया,
– उज्ज्वला लुकतुके डोंबिवली
मो. क्रमांक9819388415