स्वप्नसखी – व्हॅलेंटाईन डे स्पेशल कविता
स्वप्नसखी
सुखद गारवा
मंद धुके ।
नकळे केव्हा
डोळा लागे ।१।
शिथिल झाली
सारी गात्रे ।
किंचित स्मित
गाली पसरे ।२।
मोहक भासे
स्वप्न नवे ।
मनातील सखी
सहज बिलगे ।३।
स्वप्नी भेट
सुखाची सजे ।
नजर सुखाची
भाषा संवादे ।४।
धुंद एकांत
प्रणयगंध परिमळे ।
किती वेळ ते
दोघा नकळे ।५।
गूढ संवेदना
अंतरी उठे ।
घट्ट झाली मिठी
स्वप्नभेटी मधे ।६।
कोमल किरण
धुक्यातून झिरपे ।
जड पापणीचे तो
घेई पापे ।७।
स्वप्न फिटे
सखी विलगे ।
मोहक भास तो
मनी तरंगे ।८।
डॉ. मिलिंद न. जोशी


