युरोपमधे डॉक्टर होण्याची संधी.
मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ सिलेसिया इन केटोविक, पोलंड ची स्थापना 1948 या वर्षी झाली. तेंव्हा पासून, साधारण 75 वर्षे युनिव्हर्सिटीचा विस्तार आणि विकास होत आहे. पहिल्या वर्षी शिकवायची सुरुवात झाली तेंव्हा, मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ सिलेसिया इन केटोविक मधे मेडिकल आणि मेडिकल-डेन्टल विद्याशाखेत साधारण 200 विद्यार्थी होते. वर्तमान काळात 5 विद्या शाखा आणि 18 मेडिकल स्पेशालिटीज (विशेष) विभागात, साधारण 11,000 विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी 6 हॉस्पिटल्स आणि दंत विषयक (डेन्टिस्ट्री) शैक्षणिक केंन्द्रांमधून शिकत असतात आणि त्यांच्या कौशल्यांना अधीक निपुणता देत असतात.
राष्ट्रीय शिक्षण आणि संशोधन प्रणालीचा अविभाज्य भाग या नात्याने, मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ सिलेसिया इन केटोविक आपले ध्येय म्हणून वास्तविक संशोधनाचे आयोजन करणे आणि ते पोहचवणे हे काम विद्यार्थी प्रशिक्षणाने करते.
1996 या वर्षी आम्ही आमचा वैद्यकीय (औषध) क्षेत्रातील अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमातून आन्तरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुला केला. 2023 या वर्षी यूनिवर्सिटीने इंग्रजी माध्यमातून 9 अभ्यासक्रम दिले ते पुढील प्रमाणे आहेत.
युनिफाइड मास्टर्स डिग्री प्रोग्राम (अेकत्रित पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रम) या शिर्षकाखालीः
मेडिसिन (वैद्यकीय), डेन्टिस्ट्री (दन्त चिकित्सा), सायकोथेरपी (मानसोपचार) आणि फार्मसी (औषध विषयक).
फ़र्स्ट सायकल डिग्री प्रोग्राम ऑफ ( पुढील शाखांचा प्रथम चक्र अभ्यासक्रम): मेडिकल बायोटेक्नॉलॉजी, नर्सिंग(शुश्रूषा), मिडवाइफ़री (सुतिका शास्र), आणि पब्लिक हेल्थ ( सार्वजनिक आरोग्य).
सेकंड सायकल डिग्री प्रोग्राम ऑफ (पुढील शाखांचा द्वितीय चक्र अभ्यासक्रम): मेडिकल बायोटेक्नॉलॉजी, नर्सिंग(शुश्रूषा), मिडवाइफ़री (सुतिका शास्र), आणि पब्लिक हेल्थ ( सार्वजनिक आरोग्य) आणि डाएटेटिक्स (आहार शास्त्र).
आमचा सिग्निफिकन्ट मेडिसिन प्रोग्राम ( लक्षणीय वैद्यकशात्र अभ्यासक्रम) हा 6 वर्षांचा अभ्यासक्रम आहे जो औपचारिक( फॉर्मल) परीक्षा दिल्यावर पूर्ण होतो. पदवी मिळाल्यावर युनिव्हर्सिटी 6 महिने इन्टर्नशिप (प्रशिक्षण कार्यक्रम) देते.
मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ सिलेसिया इन केटोविक येथे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्षी दोन सत्रांमधे प्रवेश दिला जातो. फॉल आणि स्प्रिंग सेमिस्टर. युनिव्हर्सिटीत युरोपियन आणि इन्टरनॅशनल (आन्तरराष्ट्रीय) अशा दोन प्रकारचे अभ्यासक्रम राबविले जातात. आमच्याकडेील अभ्यासक्रमांना पोलिश एक्रेडिटेशन कमिटी, एक्रेडिटेशन कमिटी ऑफ अकॅडेमिक मेडिकल युनिव्हर्सिटीज, यू.अेस. डिपार्टमेन्ट ऑफ अेज्युकेशन, मेडिकल बोर्ड ऑफ न्यू योर्क आणि कॅलिफोर्निया या मान्यवर संस्थांचे एक्रेडिटेशन आणि रेकगनिशन (अधिकृत मान्यता)आहे.
पात्रता: सेकन्डरी स्कूल लीव्हिंग परीक्षा (माध्यमिक शाळा परीक्षा उत्तिर्ण प्रमाणपत्र)/ फायनल परीक्षा ॲडव्हान्स्ड/अेक्सटेंडेड लेव्हल जी प्रवेश पध्दतीसाठी आवश्यक असेल.
विषयः
बायॉलॉजी (जीवशास्त्र) आवश्यक.
केमिस्ट्री (रसायन शास्त्र) किंवा फ़िज़िक्स ( पदार्थ विज्ञान) किंवा मॅथेमॅटिक्स (गणित).
————————
डेन्टिस्ट्री प्रोग्रॅम (दंतवैद्यक कार्यक्रम/ अभ्यास). हा आमचा दुसरा लक्षणीय अभ्यासक्रम जो पूर्ण करायला 5 वर्षे लागतात, ज्यात थिओरॅटिकल (सैध्दांतिक), प्रि-क्लिनिकल (पूर्वनिष्ठ),क्लिनिकल (चिकित्सा विषयक) आणि समर हॉलिडे इन्टर्नशिप (प्रशिक्षण कार्यक्रम) याचा समावेश होतो.
मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ सिलेसिया इन केटोविक मधील शिक्षण विद्यार्थ्याला पोलंड मधील अेका सर्वात मोठ्या वैद्यकीय आणि सिम्युलेशन ( सरावासाठी/ प्रशिक्षणासाठी बनवलेल्या) केंन्द्रात प्रवेश मिळवून देते. तेथे ख-या हॉस्पिटल मधील कामा प्रमाणे वातावरण निर्मिती केलेली असते. या सेन्टरला असे सहा कक्ष आहेत. ऑपरेटिंग (शस्त्रक्रिया) रूम, इन्टेन्सीव्ह केअर ( अति दक्षता) रूम, 2 हॉस्पिटल इनर्जंसी ( रुग्णालय आपत्कालीन) रूम्स, पेडिअॅट्रिक (बालरोग) रूम आणि डिलिव्हरी (प्रसुती) रूम. या शिवाय हॉस्पिटलमधे दाखल होण्यापूर्वीची प्रक्रिया तसेच ॲम्ब्युलन्स प्रशिक्षण ह्याच्या सरावासाठी वेगळी जागा आहे.
मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ सिलेसिया इन केटोविक येथे प्रवेशाची तारीख एप्रील 28 ते जून 11.
कॉम्प्लिमेंटरी (पूरक) प्रवेश विन्टर सेमिस्टर 2023/24,
जुलै 22 ला सुरू.
अधीक माहितीसाठी कृपया डी. बी. काळे, हायगेट अकॅडमी इन्डिया, मोबाइल: 9870499953 या नम्बरवर फोन करावा अथवा [email protected] या इमेलवर संपर्क करावा.