रामनवमी

चैत्र शु . नवमी हा श्रीरामाचा जन्मदिवस , म्हणून या तिथीस रामनवमी म्हणतात . रामाला देव मानून आपण त्याची पूजा करतो . रामाला हे देवपण मिळाले ते त्याच्या अंगी असलेल्या एकबाणी , एकपत्नी आणि एकवचनी या अलौकिक गुणांमुळे . त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती , म्हणून त्याच्या राज्यास रामराज्य म्हणतात .
या दिवशी दुपारी रामजन्म साजरा होतो . त्यानंतर संपूर्ण दिवस रामनामाचा जप , -कथा कीर्तन व राम गुणगान असे कार्यक्रम होतात . अनेक ठिकाणी गीतरामायण म्हटलं जात . रामजन्म म्हणजे आदर्श , मर्यादा आणि सद्गुणांची सगुण पूजा .

शिवकालीन काळात समर्थ रामदासांनी रामभक्तीला कालानुरूप उजाळा देऊन सद्गुण , पुरुषार्थ , पराक्रम आणि निष्ठा या गुणांची वाट मोकळी करून प्रजाजनांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांनी सहभागी केलं . गेल्या ब्रह्मचैतन्य श्रीगोन्दावलेकर महाराज यांनी रामभक्तीचा मोठा प्रसार केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu