निद्रा आणि योगा

निद्रानाशाच्या समस्येवर योगाभ्यास हा उत्तम तोडगा ठरू शकतो.योगाभ्यासाच्या सरावाने दिवसभरात साठलेला तणाव निवळतो व रात्री शांत झोप लागते.

हस्तापादासन :    

   

पाठीचे स्नायू ताणले जातात, रक्त पुरवठा वाढल्याने मज्जासंस्था पुष्ट होते आणि पाठीचा कणा लवचिक राहतो.

 मार्जरी आसन:

पाठीच्या कण्याची लवचिकता टिकून राहते. पचन संस्थेलाही चालना मिळते व तिची कार्यक्षमता वाढते. ह्यामुळे शांत झोप लागते. रक्ताभिसरण वाढल्याने मनही शांत होते.

शिशु आसन:

पूर्ण विश्रांती देणारे हे आसन आहे. मज्जासंस्था स्थिर झाल्याने झोपही शांत लागते. 

बद्धकोनासन :

तासंतास उभे राहिल्याने किवा चालल्याने आलेला थकवा घालवण्यासाठी उत्तम. मांड्यांचा आतील भाग, जांघा आणि गुडघे चांगलेच ताणले जातात. 

 विपरीत करणी :

पाठीवर झोपावे .एक पाय वर उचलावा, मग दुसरा पायही वर उचलावा. मग भिंतीच्या आधाराने दोन्ही पाय वर ठेवावेत. दोन्ही हात बाजूने खांद्याच्या रेषेत आणावेत. ह्याच स्थितीत दीर्घ श्वासोच्छवास चालू ठेवावा. पूर्ण विश्रांतीसाठी डोळ्यावर पट्टी बांधावी. आरामात राहता येईल तेवढा वेळ ह्याच स्थितीत राहावे. हळू हळू पाय खाली आणावे.

 शवासन :

ह्याव्यतिरिक्त जेवणानंतर शवासन आणि योगनिद्रा केल्याने सगळ्या स्तरांवर विश्रांती मिळते.

pc: google

Main Menu