कोकणातील श्रीदेव लक्ष्मीनारायणाचा कार्तिकी उत्सव.
महाराष्ट्रातील कोकण हा भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. याच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील, रत्नागिरी तालुक्यातील उत्तर टोकाकडे वसलेल एक गाव म्हणजे नांदिवडे गाव. हे गाव समुद्र किनारी वसलेले आहे. गावाच्या पश्चिम आणि उत्तर दिशेला समुद्र, पूर्वेला जयगडची खाडी आणि दक्षिणेला जमीन अशी भौगोलिक रचना आहे. या गावात अनेक जातीची माणसे गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
या गावातील ब्राह्मण समाजाचा १४० वर्षे पूर्ण झालेला उत्सव म्हणजेच कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा असा पाच दिवसांचा श्रीदेव लक्ष्मीनारायणाचा कार्तिकी उत्सव. हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. उत्सवाच्या पाचही दिवस सकाळी श्रींवर पवमान अभिषेक व रोज त्या परिसरातील एका मंदीरातील देवावर अभिषेक केला जातो. संध्याकाळी आरती मंत्रपुष्प व भोवत्या (टिपऱ्यांचा नृत्यप्रकार) व रात्री नारदीय कीर्तन. उत्सवात एक दिवस माताभगिनींसाठी हळदीकुंकू कार्यक्रम केला जातो. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित महिला फुगड्या, टिपरी, झिम्मा इत्यादी खेळ खेळतात. शेवटच्या दिवशी पौर्णिमेला महाप्रसाद आणि रात्री नाट्यप्रयोग सादर केला जातो. उत्सवात स्थानिक लोकांचा गाण्याचा कार्यक्रम तसेच एखाद्या वर्षी नृत्याचा कार्यक्रमही केला जातो. अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो.
– श्री. दत्तात्रेय गो. बिवलकर







thinkmarathi@gmail.com या ई-मेल आयडी वर मेल करू शकता.