लंबक

माणूस जन्माला येताना  रडत या जगात येतो.  वेदनाही त्याला मातेच्या उदरापासून माहित झालेली असते.  आयुष्याच्या लढाईत कधी कधी ती मनोवेदना  म्हणून  बनून जाते. 
गेले काही दिवस लाजरीबुजरी निशा एकदम आईला, सरलाबाईनाही उलट उत्तर देऊ लागली होती.  सर्वांचे काम मुकाट्याने करणारी आता सर्वांना ऑर्डर सोडू लागली  होती.   “ए आई, उपीट कर मला लगेच, या ड्रेसला इस्त्री करून दे आत्ताच. कोणी तिला काही काम सांगितलं तर अडलंय माझं खेटर,  करत नाही जा ” अशी भाषा बोलत होती.
लहानपणापासूनच निशाअगदी मुखदुर्बळ. कायमच तिला भित्रा ससा, गरीब कोकरु अशा उपमा मिळत. सहा वर्षांनी लहान बहिण उषा बिनदिक्कत तिला मिळालेले पेन,पर्स , टिकल्या, दागिने लंपास करीत असे. निशाच्या वाटणीचे आवडीचे चॉकलेट, लाडू फस्त करीत असे. निशा चरफडे  पण कधीच खरमरीत शब्दात उषाची कान उघडणी करीत नसे. खेळतानाही सर्व मुले लबाडीने तिला सतत राज्य घ्यायला लावत. सहनशक्ती संपली की निशा रडत घरी येई. शाळेतही शिक्षकांचा मार चुकवायला मुलीं निशावर खोटा आळ घेत. तिला बळीचा बकरा बनवित. निशा मुकाट मार खाऊन घरी येऊन रडत बसे. सरलाबाई तिला हुशारीने उपदेशाचे चार डोस पाजत. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. या मुलीचे कसे होणार निर्दय जगात! या विवंचनेमुळे सरलाबाई कित्येक रात्री झोपल्या नव्हत्या . पण आता त्यांची झोप उडाली होती . अगदी निराळ्या कारणांनी.

रिक्षावाल्याला सुट्ट्या पैशांवरून निशा म्हणाली उचल पैसे येणे तोंड काळ कर फुकट नाही केलस तू काही आम्ही तुझ्या रिक्षात बसलो आहे भाग्य समज. तिखट सांबार खाऊन सरळ हॉटेल मालकाला म्हणाली तुझ्या बायकोचा तोंड जाळ्यांनी भाजी मार्केट देवळातील बस चिराग जिथे म्हणून समाज गर्दीचा दबाव दिसून येईल तिथे निशा भांडण उकरून काढून अर्वाच्य शब्दात लोकांचा समाचार घेईल तिच्या बोलण्यातला कित्येक शब्द आधी तिलाच माहीत नव्हते हुशार म्हणाली सुद्धा हल्ली निशा अमिताभ बच्चन सारखे जमाने को जला डालो का वागते आहे तिच्या वागण्या बोलण्यात अरेरावी बेदरकारी फक्त दिसू लागेल असेच काही दिवस गेले आणि एका सकाळी नऊ वाजले तरी निशा खोलीबाहेर आली नाही. तिच्या वागण्यात तिच्या काळजाचा ठोका चुकला पण निशा तशी ठीक होती तिचा अतिउत्साहाच्या ऊर्जेचा अत्यंत आणि वर येऊन थांबला होता पण एक आठवडा पुढे आठवडाभर ती अशीच दुपारी बारा वाजेपर्यंत झोपले नाही दोन-तीन दिवस कपडे बदलत नसेल तर आंघोळी करत नसेल तसेच नवीन भरलेले असत डोळे तारवटलेले असत नजर कुठेतरी शुन्यात लपलेली असते खाण्यापिण्याचे काहीच भान नसेल बळेबळे चार घास करावे लागत. घरी आलेल्या भिशीच्या बायकांनी तिला असं पाहून चमत्कारिक पण त्यांच्यामध्ये बिनतोड उपाय सुचवले कोणी म्हणाले मांजरी बोलवा म्हणाली निर्जळी अनवाणी महा शनिवार कर एक म्हणाली सरला तुझी काळजात तुझा छकुला करायला कोणाला वाटलं नक्की प्रेम म्हणूनच हा दहावी तर हात पिवळे करून टाक पण जाणाऱ्या देशाकडे पाहून सरला साईंचे मातृहृदय  पिळवटून निघ.

 निशा देवा अरेरावी वागू लागली तेव्हा त्यांना वाटले की वर्ष सर्वांना घाबरून तिच्या मनाचा कोंडमारा होत होता ती घुमणारी दबलेली रागाचे वापस कशी बाहेर पडते. पण निशा तिच्या निरुत्साही निरुद्देश जगात शिरल्यावर त्यांना खटकू लागलं शेवटी त्यांनी त्यांच्या भाचीला डॉक्टर नेहा ला फोन केला तीनही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरलाबाई ना डॉक्टर शिल्पा सायकियाट्रिस्ट मानसोपचार तज्ञ होती तिची भेट घेऊन दिली डॉक्टर शिल्पाने निशाला नीट तपासून तिचे बाइपोलर डिसऑर्डर म्हणजे मेनिया असे निदान केले कधीकधी मेंदूतील उत्प्रेरक बंडू करतात त्याला जेनेटिक्स ही बैठक असू शकते मग आधी अतिउत्साही तर कधी कासवाच्या कवचाच्या आत असा वागतो निशा च्या बाबतीत तिला न जाणाऱ्या ऍलर्जीच्या कोरड्या खोकल्यासाठी च्या गोळ्या दिल्या होत्या त्यातून जी का जागा हवी असे लोक म्हणत होती ती सुद्धा त्या काळी कदाचित याच शिकार होती या सगळ्या जुळलेला योगामुळे तिचा आजार सुरू झाला होता आता नियमित औषध गोळ्या कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी जीवनशैलीचे समुपदेशन यांच्या पद्धतीने देशाची तर घसरलेली गाडी रुळावर आणायची होती चुकीच्या सामाजिक समजुतींच्या आहारी न जाता विज्ञानाची कास धरून निशाच्या आयुष्याचा झाकोळलेला ग्रहण लागलेला सूर्य सोडवायचा होता पुन्हा प्रकाशमान करायचा होता यासाठी वेळी लागणार होता पण सरलाबाई उषा निशा चे बाबा तिच्यामागे खंबीरपणे उभे होते.

 ©मोनाली हर्षे 
  पुणे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu