गुरु पौर्णिमा

आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी होते . व्यास मुनी यांनी वैदिक संस्कृतीच्या जडण घडणीच फार मोठ कार्य केल आहे . चार वेद , भक्तीचा सुकाळ घडवून आणणारी अठरा पुराणे , महाभारतासारखा अलौकिक ग्रंथ अशा अलौकिक ग्रंथ रचना करून त्यांनी वैदिक संस्कृतीचा आचार व विचार भारतीय समाजासमोर पिढ्यानपिढ्या साठी ठेवला .भगवान श्रीकृष्णानेही त्यांचा गौरव केला आहे . व्यक्ती आणि समाज या दोहोंचाही उद्धार घडवून आणणारा सम्यक विचार त्यांनी जगाला दिला . मानवी जीवनाबद्दलची करुणा आणि मानवी जीवनाचा उद्धार घडवून आणण्याची अपार कळकळ यामुळेच व्यासमुनींना ज्ञानी – प्रज्ञावंतानी गुरुपद देवून त्यांची पूजा केली . व्यास पूजा म्हणजे गुरुपूजा होय .

याज्ञवल्क्य – जनक – शुकाचार्य , सांदिपनी – कृष्ण , विश्वामित्र – राम , द्रोणाचार्य – अर्जुन , शुक्राचार्य – कर्ण हि गुरु – शिष्य परंपरा पाहिली की गुरु पौर्णिमेचे महात्म्य जाणता येतं .
माणसाला अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे हात धरून नेणारा प्रेमळ ज्ञानी म्हणजे गुरु . तो माणसापेक्षा श्रेष्ठच पण देवापेक्षाही श्रेष्ठ . म्हणून त्यास परब्रह्माइतक श्रेष्ठ मानलं जातं . लौकिक जीवनातील गुरूस या दिवशी वंदन करून त्याची पूजा करून कृतज्ञतेने त्याचे ऋण फेडण्यासाठी त्यास गुरुदक्षिणा देतात . या बरोबरच गुरूंनी दिलेल्या ज्ञानावर मनन – चिंतन करून ते आचरणात आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प या दिवशी करणे खूप उचित ठरेल .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu