डॉ. मिलिंद न. जोशी यांच्या ‘यांगोन यात्रा’ या ई – पुस्तकाचे प्रकाशन

‘प्रवासरंग’, ‘रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार(१९०१ ते २०१८)’ व ‘कंबोडियातील अंगकोर वाट आणि परिसर’ या
डॉ. मिलिंद न. जोशी यांच्या प्रसिद्ध  पुस्तकांनंतर ‘यांगोन यात्रा’ हे त्यांचे  चौथे  पुस्तक ‘सहित प्रकाशन’तर्फेच वाचकांसमोर येत आहे. 

या आगामी पुस्तकाच्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता डॉ. मिलिंद न. जोशी म्हणाले ,
“आमच्या चारच दिवसांच्या यांगोन यात्रेवर एक छोटेखानी पुस्तक तयार होऊ शकतं असा आशावाद यांगोन यात्रेदरम्यानच निर्माण झाला.

‘कंबोडियातील अंगकोर वाट आणि परिसर’चं लिखाण ‘टंक’लेखनाऐवजी ‘टंग’लेखन पद्धतीने ‘गूगल ड्राइव्ह’वर तोंडी केलं होतं. ‘यांगोन यात्रा’चं लिखाण भ्रमणध्वनीच्या ‘गूगलॲप’वर बसल्याजागी करून एक वेगळा आनंद घेता आला.

२४ मार्च २०२० पासून सुरू झालेल्या ‘लॉक डाऊन’ने अनपेक्षितपणे मिळालेल्या अधिकच्या वेळेचा सदुपयोग ‘यांगोन यात्रा’चं उर्वरित लिखाण पूर्ण करण्यासाठी करता आला आणि उद्दिष्टपूर्तीचं समाधान मिळालं. ‘लॉक डाऊन’चा वाढत गेलेला कालावधी, तसंच ‘करोना’ संकटात पुस्तक छपाई व छापील प्रतींचं वितरण शक्य होणार नसल्याची तसंच त्यातील अनुषंगिक धोक्यांची जाणीव झाल्यावर, ‘यांगोन यात्रा’, इ-पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीस आणण्याचा निर्णय घ्यावा लागला. दरम्यानच्या काळात वाचकांच्याही मानसिकतेत झालेला बदल व एकंदरच इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी जुळवून घेण्याकडे वाढलेला कल लक्षात घेता, वाचक ह्या इ-पुस्तकाचं नक्की स्वागत करतील, असा विश्वास वाटतो. पुढील काळात, परिस्थिती बदलल्यावर, पुस्तकाच्या ‘छापील प्रती’चा विचार करणं शक्य होऊ शकेल.

‘यांगोन यात्रा’च्या लिखाणाच्या वेळी मी यांगोन यात्रा अनेकदा अनुभवली. यांगोन यात्रेदरम्यान आम्हाला आलेली अनुभूती वाचकांना निश्चितच समाधान देईल. हा लेखनप्रपंच मला आगळा आनंद देऊन गेला; तो वाचकांसमोर पुस्तकरूपात आणताना द्विगुणित होत आहे.”

‘यांगोन यात्रा’ हे  इ-पुस्तक ‘सहित प्रकाशन’ तर्फेच वाचकांच्या भेटीला आलं आहे. आजपासून ‘बुकगंगा’ (Bookganga) ह्या ऑनलाइन संकेतस्थळावर ते विक्रीसाठी उपलब्ध आहे. 
खालील लिंक वर क्लीक करून ते पुस्तक वाचकांना विकत घेता येईल.  

https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5762505442376188619?BookName=Yangon-Yatra

डॉ. मिलिंद न. जोशी

संपर्क : ९८९२०७६०३१
milindn_joshi@yahoo.com   

Main Menu