आषाढी एकादशी

आषाढाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीस ‘देवशयनी एकादशी असे म्हणतात . या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते . लाखो वारकरी त्यावेळी विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून टाकतात . महाराष्ट्रात या दिवशी उपवास व श्रीविठ्ठलाची पूजा केली जाते . भजन , पूजन , कीर्तन , हरीकीर्तनासाठी जागरण असे उपक्रम आयोजले जातात . अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहानथोर सहभागी होतात . पंढरपूर येथे विठ्ठलभक्तीचा सुकाळ असतो . विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळीना जीवाचा जिवलग भेटावा असं समाधान मिळत . चंद्रभागेच स्नान करून हि मंडळी घरी परततात . या एकादशीच हे व्यापक स्वरूप पाहता तीचं महाएकादशी हे नाव सार्थ ठरत .

भागवत धर्मानुसार एकादशीच्या उपवासासं फार मोठं पारमार्थिक मोल प्राप्त झालेलं आहे . म्हणून वारकरी संप्रदाय प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशा नित्यव्रत म्हणून पाळतात . या दिवशी तहानभूक हरपून जावी इतकं ईश चिंतन करावं असं शास्त्र सांगत .

या दिवशी देव झोपी जातो असा समज आहे . म्हणून तिला देवशयनी एकादशी म्हणतात . पुढील चार महिने वेगवेगळी व्रते , पूजा , सण , उत्सव तसेच जपतपादी कर्म करून भक्त आपल्या देवास संतोषविण्याचा प्रयत्न करतात .

या दिवसापासून भाविक स्त्री – पुरुष अनेक नेम सुरु करतात . अनेक परिवारात श्रावण महिन्यात पालेभाज्या ,भाद्रपात महिन्यात दही व दह्याचे पदार्थ ,आश्विन महिन्यात दुध व दुधाचे पदार्थ आणि कार्तिकात द्विदल धान्ये म्हणजे कडधान्ये वर्ज्य करतात . काही जण चार महिने एकभुक्त राहतात. काही सुखशय्या वर्ज्य करतात . काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात . नित्य देवदर्शन , कथा -कीर्तन , श्रवण , पूजा , अभिषेक , नित्य नदीस्नान असे अनेक नेमधर्म आचरण्याची परंपरा आजही सर्वत्र सुरु आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu