थिन्कमराठी.कॉम सादर करत आहे , गोष्टींची मज्जा ….
नमस्कार ,
थिन्कमराठी.कॉम तर्फे मागेही आम्ही एक स्पर्धा ठेवली होती , यावेळी हे स्पर्धेच्या स्वरूपात नसून आजी आजोबा, आत्या, काका , मावशी, आई , बाबा या सर्वाना एक आवाहन करत आहोत. तुमच्या पैकी जर कोणाला छान छान गोष्टी सांगता येत असतील तर त्यांनी गोष्ट सांगताना त्यांचा एखादा विडिओ , किंवा ऑडिओ आणि अगदीच सांगतानाच नको असेल तर लिहिलेली गोष्ट आम्हाला नक्की कळवा.
तुमच्या गोष्टी नक्कीच ज्यांना गोष्टी सांगायला कोणी नाही अशा मुलांना किंवा ज्यांना कोणती गोष्ट सांगायची हा प्रश्न पडत असतो अशा पालकांसाठी नक्कीच एक छान पर्वणी ठरेल.
थिन्कमराठीचा हा नवीन उपक्रम आपली संस्कृती , संस्कार, ठेवा , शिकवण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न आहे.
तुम्हाला जमलं ,आवडलं तर या उपक्रमात नक्की सहभागी व्हा !
तुमच्या गोष्टी विडिओ / ऑडिओ / लिखित स्वरूपात खाली दिलेल्या ई-मेल आयडी वर ई-मेल करा अथवा दिलेल्या नंबर वर व्हाट्स अँप करा :


