उत्तेजनार्थ पारितोषिक | ती एक भाषा-डॉ हिमगौरी सतिश वडगावकर –
ती एक भाषा
चेहर्याविना नजरेतून
थेट पोहचते ‘ती’ भाषा…
शब्दाविना स्पर्शातून
क्षणी रोमांची ‘ती’ भाषा…
दृष्यमान नसता आठवातून
काळापल्याडची ‘ती’ भाषा…
व्यक्त न होता अव्यक्तातून
मुकेपणातील बोलकी भाषा
आसवांच्या ‘ओघळा’तून
ह्दयास ओलावते ‘ती’भाषा…
घेण्यास हव्यासात नसते
पण देण्यात गुंतली ‘ती’ भाषा…
बेरीज वजाबाकी नको इथे
जीवनगणिती अचूक भाषा..
हृदयापासून हृदयापर्यंत
माध्यमाविण ‘ती’ भाषा…
खरेच…
भाषेविणची असे ही भाषा
अतीव प्रेमगंधी क्षितीभाषा…
मनामनांची अबोल अतर्क्य
सीमान्तापल्याडची निःसिम भाषा….
- डॉ हिमगौरी सतिश वडगावकर
पुणे
उत्तेजनार्थ पारितोषिक (कविता)


