मकर संक्रांतीला या टिप्स देतील तुम्हाला आकर्षक लूक 

मकरसंक्रातीला चारचौघात उठून  दिसायचयं  पण यावेळी  नेहमी सारखा कॉमन लुक करायचा नाहीय..तर हा लेख तुमच्यासाठी…
मकरसंक्रांत हा सण इंग्रजी महिन्यातील नवीन महिन्यात येणारा पहिला सण आहे. हा सण थंडीच्या दिवसात येतो आणि गडद रंगात विशेष करून काळ्या रंगात उष्णता शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे थंडी कमी व्हावी आणि शरीराला उब मिळावी यासाठी संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. सणांच्या दिवशी मार्केटमध्ये स्त्रियांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारची अनेक वस्त्रे आपल्याला पाहायला मिळतात.   त्यातलेच काही प्रकार पुढील प्रमाणे जे या मकर संक्रांतीला तुम्हाला एक वेगळा लुक देतील.

१) सध्या कॉटन साडीचा ट्रेंड सुरू आहे.  विशेष म्हणजे या साड्या वजनाला हलक्या आणि दिसायला आकर्षित दिसतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या साड्या अंगाला व्यवस्थित बसतात त्यामुळे अनेकांना या साड्या नेसायला आवडतात.  मार्केटमध्ये सध्या पदराला गोंडे असणारी प्लेन काळी साडी किंवा साडीवर पेंटिंग केलेली साडी आपल्याला पाहायला मिळते. या साडींवर तुम्ही मल्टी कलरचा कोणताही डार्क शेड  किंवा पेल्न फुल सिल्वज किंवा हाफ सिल्वज गुलाबी, लाल, नारंगी,  ऑफ फाईट असा ब्लाऊज बिनधास्तपणे परिधान करू शकता.  याचबरोबर हातात सिल्वर बांगड्या,  कानात सिल्वर झुमके, आणि गळ्यात एक साधी सिंपल चैन तुम्ही घालू शकता. याचबरोबर हाफ केस बांधून त्यावर वरील दिलेल्या फोटो प्रमाणे गजरा माळल्यास तुमचा लुक अजून खुलून दिसेल.  याचबरोबर काळ्या साडीवर तुम्ही सिल्वर झुमके बेन्टेक्स ऑक्साईड ज्वेलरी दोरा कुठे ज्वेलरी परिधान करू शकता.

२) नवीन ट्रेन नुसार आपल्याकडे किंवा आई-  आजीकडे एखादी तरी काळी साडी असेलच जी फारशी नेसली जात नाही. अशा साडीचा लॉंग अनारकली किंवा धोती कुर्ता अशा पॅटर्नमध्ये एखादा ड्रेस तुम्ही शिवून घेऊ शकता.

३) स्काफ जॅकेट या गोष्टी ड्रेसचा लुक जास्त खुलवण्यासाठी उपयुक्त असतात यामुळे आपण नेहमीपेक्षा जास्त रुबाबदार दिसू शकतो काळ्या रंगाच्या कोणत्याही ड्रेस वर एखाद्या ट्रेंडी शॉट किंवा लॉंग जॅकेट तुम्ही परिधान करू शकता.
४) सध्या पुरुषांच्या कपड्यांमध्ये सुद्धा आपल्याला विविधता पाहायला मिळते. जसं की नवीन लग्न झालेलं असेल किंवा छान तयार व्हायची इच्छा असेल तर मोदी जॅकेट आणि पॅन्टचं कॉम्बिनेशन पुरुषांवर अधिक सुंदर दिसेल. त्यातही प्लेन पेक्षा फ्लॉवर प्रिंट मोदी जॅकेट असेल तर अधिकच सुंदर.

४) सध्या पुरुषांसाठी कुर्तामध्ये सुद्धा बरेच ऑप्शन आले आहेत. अंगरखा पॅटर्न जो फक्त शेरवानी मध्ये उपलब्ध होता आता तो कुर्त्यांमध्ये देखील आला आहे.  यावर राजस्थानी किंवा मंडला आर्ट चे डिझाईन सुद्धा असते. हे कुर्ते विशेष करून 18 ते 30 या वयोगटातील किंवा ज्यांची पिळदार शरीर यष्टी आहे त्यांच्यावर अधिक साजेसे दिसतात.

५) थोडा इंडो वेस्टर्न लूक हवा असेल तर शॉर्ट कुर्ता हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.  याहून उत्तम  आणि सध्या ट्रेंडिंग असणारं आऊटफिट म्हणजे आई- बहिण- – बायको यांच्या साडीचा पुरुषाला शोभेल असा लॉंग  कुर्ता. (अगदी वरती दिल्याप्रमाणे)  हा कुर्ता परिधान करताना तुम्ही कानात बाळी घातली तर अजून मराठमोळा साज तुम्ही मिरवू शकता.


६) सध्या #twinning  हे खूप जलद गतीने वाहत जाणारं वारं आपल्याला सोशल मीडियावर पाहिला  मिळतं. हा हा सुद्धा एक ट्रेडिंगचा भाग आहे.  तुम्हाला सुद्धा या मकर संक्रांतीला फॅमिली सोबत ट्विनिंग करायचं असेल तर तुम्ही छान असं साडीचा कापड घेऊन तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने कुर्ते, ड्रेस वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये शिवून घेऊ शकता. एवढेच नाही तर वेगवेगळ्या दुकानात तसेच काही पर्सनलाईज शॉप मध्ये वरती  दिल्याप्रमाणे ‘फॅमिली कॉम्बो’ असे कपड्यांचे मॅचिंग सेट उपलब्ध आहेत.
आमच्या या मिनी टिप्स वापरून तुम्ही यावर्षीची मकर संक्रात जरा ट्रेंडिंग युनिक त्याचबरोबर पारंपारिक पद्धतीने साजरी करा. आणि दर महिन्याला स्टायलिंग संबंधित आमचे ब्लॉग  वाचण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा.

तानिया प्रेरणा प्रेमनाथ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu