दसरा

“दसरा सण मोठा – नाही आनंदाला तोटा”हा सण नवरात्र संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी येतो . अश्विन महिना म्हणजे पावसाळ्याचा सरता काळ . निसर्ग प्रसन्न असतो आणि शेतीतील पिक समृद्ध झालेली असतात . हे खरे तर सुगीचे दिवस . धानाधान्यामुळे शेतकरी आनंदात असतो . प्रपंचातील इतर कामे करायला त्याला वेळ मिळतो . नवी काम सुरु करता यावी म्हणून तो दसऱ्याचा मुहूर्त धरतो . साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा हा एक शुभ मुहूर्त होय . या दिवशी पूर्वी शिक्षणाची सुरुवात होत असल्याने या दिवशी सरस्वती पूजन करतात आणि हत्यारांचीही पूजा करतात .

दसऱ्याच दुसरं नांव आहे विजयादशमी. शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने, अज्ञानावर ज्ञानाने, विजय मिळवायचा दिवस म्हणजे दसरा .

दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या प्रारंभ , घर, गाडी, बंगला, सोन्या चांदीचे दागिने यांची खरेदी या गोष्टी केल्या जातात. नवे व्यवसाय सुरु केले जातात.

ह्या दिवशी घरोघरी पंचपक्वान्ने केली जातात . संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना देऊन , त्यांच्या पाया पडून ‘ नमस्कार फुकाचा आणि आशीर्वाद लाखाचा ‘ असे म्हणत लाख मोलाचे आशिर्वाद घेतले जातात .

उत्तर प्रदेशात या दिवशी रामलीला खेळली जाते व रावणाच्या प्रतिमेचा जाहीरपणे वध केला जातो . मुंबईतही असे जाहीर कार्यक्रम आयोजित केले जातात . सणापेक्षा या दिवसाला उत्सवाचे स्वरूप अधिक असते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu