तुलसी विवाह

कार्तिक शु . द्वादशीस तुळशीचे लग्न कृष्णाशी लावण्याची प्रथा आजही अनेक कुटुंबात पाळली जाते . तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे. अनेक बायका आषाढी एकादशीस तुळशीच रोप लावून त्यांना चार महिने रोज पाणी घालून वाढवितात आणि या तुळशीचा विवाहविधी कार्तिक शु . द्वादशीस पार पाडतात . तुळस हि अतिशय पवित्र , औषधी आणि बहु उपयोगी वनस्पती असल्याने प्रत्येक दारात तुळशीच रोप लावण्याची परंपरा आहे . तुळस स्त्रियांना अतिशय प्रिय असल्यामुळे तिचे लग्न म्हणजे घरात मोठा आनंद सोहळा असतो . त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत हा विवाह केला जातो . त्रिपुरी पौर्णिमेस त्रिपुर दैत्याचा वध करून शंकराने सर्व देवांना मुक्त केल्यामुळे व त्रिपुराचे निर्दालन झाल्याने या दिवशी देवलोकात दिवाळी साजरी होते . म्हणून या दिवसाला देव दिवाळी असेही म्हणतात . या दिवशी शंकराच्या देवळात त्रिपुर लावण्याची प्रथा आहे . काही ठिकाणी नुसतेच दिवे लावून हा सण साजरा करतात .

तुळशीला पापनाशिनी म्हणुन अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीला वधू मानुन घरातील तुळशी वृंदावन वा कुंडी गेरु व चुन्याने रंगवितात व सजवितात आणि त्यावर बोर चिंच आवळा,कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर,चिंच,आवळा,सिताफळ व कांद्याची पात त्यात ठेवतात आणि त्यात देव्हार्‍यातील बाळकृष्णाची मुर्ती ठेवतात व तुळशीला नवीन वस्त्र घालतात . त्यावर मांडव म्हणुन उस अथवा धांड्याची खोपटी ठेवतात. त्यानंतर दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणुन त्यांचा विवाह लावला जातो. आपल्या मुलीस श्रीकृष्णासारखा आदर्श पती मिळावा असा त्यामागील हेतु आहे.

तुलसी विवाहाची पद्धत :
* तुळशी व‍िवाहाच्या चार महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला रोज न चुकता नियमित पाणी घालून त्याची पूजा करावी.
* मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा.
* चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करा.
* यानंतर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुळशीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवा.
* यजमानाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसन ग्रहण करावे.
* गोरज मुहूर्तावर (वराचे) देवाचे पूजन करावे.
* मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे.
* यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी.
* नंतर वस्त्र व आभूषणे घालावित.
* नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करावे.
* शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu