उत्तेजनार्थ पारितोषिक| शिंतोडे – वैशाली वर्तक

शिंतोडे..

साध्या शितोंड्याची विविध रुपे  रंगविण्याचा प्रयत्न  केला आहे  

शिंतोडे..

होते पहात बागेत

मनोहर पुष्करणी

अंगी पडता तुषार

जाग्या  झाल्या आठवणी

 

जात होते वाटेतून

होते साचलेले पाणी

गाडी जाता भर धाव

आली बघा आणिबाणी

 

चिखलाचे ते शिंतोडे

परिधान वस्त्रावरी

किती घाणेरडे पाणी

नको झाले क्षणभरी

 

पुढे  जाता बरसल्या

वर्षा धारा जोरदार

गेले निघून पाण्याने

शिंतोड्याचे डाग चार

 

थेंब, तुषार ,असती

सारी रुपे शिंतोड्याची

अती अल्प प्रमाणात

रूपे सारी ती पाण्याची

 

वैचारिक शिंतोडे ते

करी मनास प्रफुल्लित

विचाराने मन होई

सदा साठी आनंदित

 

साठलेले ते विचार

मन रूपी कारंज्यात

हास्य रुपी शिंतोड्यांची

करतात बरसात

 

मोदभरे हास्याचे ते

सदा तुषार उडावे

बेअब्रूचे ते शिंतोडे

जीssवनात न पडावे

वैशाली वर्तक
अहमदाबाद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu