संकष्ट चतुर्थीचे व्रत
हे व्रत खूप लोकप्रिय व्रत असून लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत अनेक स्त्री पुरुष हे व्रत नित्य नेमाने व श्रद्धेने करतात . दर महिन्याची वद्य चतुर्थी म्हणजे संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी होय .या दिवशी उपवास करतात . ज्यांना उपवास झेपत नाही ते फलाहार घेतात . रात्री स्नान करून गणेशपूजा करून त्यास २१ मोदकांचा नैवेद्य दाखवतात . गणपतीला दुर्वा आणि जास्वंदीचे लाल फुल त्यावेळी अवश्य वहावे . गणपतीची मनोभावे पूजा करून गणेश स्त्रोत्र म्हणावे . काही जण देवळात जाऊन गणपतीचे दर्शन घेतात . चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन करून साध जेवण करून उपवास सोडतात . ज्यांना वेळ असतो ते संध्याकाळी श्रीगणेशाची षोडशोपचारे पूजा करतात . अथर्वशीर्षाने अभिषेक करतात .
या व्रताचे अनेक फायदे आहेत . विघ्नहर्त्या गणेशाच्या कृपेने आपल्या जीवनातील संकटे दूर होतात व आपली बुद्धीही स्थिर राहते . कुटुंबातील मुलांनाही त्यामुळे विद्यार्जनास व आकलन शक्तीस खूप मदत मिळते . मंगळवारी येणाऱ्या संकष्टीस अंगारक चतुर्थी म्हणतात . काहीजण केवळ अंगारिका चतुर्थीच करतात . काहीजण मात्र दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थीच व्रत करतात . हे व्रत मात्र अहोरात्रीचे असल्याने या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा लागतो . भाद्रपदातील शुक्ल चतुर्थीस महासिद्धी विनायकी चतुर्थी असे म्हणतात


