सुखाचे गुंफलेले काही मोजके क्षण !! – मराठी निबंधासाठी  काही … 

सुखाचे गुंफलेले काही मोजके क्षण  !! — मराठी निबंधासाठी  काही … 

▪कोकिळेच्या मधुर स्वराने आलेली जाग
▪आलं घातलेला वाफाळणारा चहा
▪अंगणातला प्राजक्ताचा सडा,
▪सगळ्यात पहिल्यांदा आपल्याच हातात पडलेला पेपर ,
▪अवीट गोडी असलेलं … लताचं
“सुनो सजना पपीहे ने कहा सब से पुकारले के …”,
▪लिंबू पिळलेला आणि वरुन साजूक तूप घातलेला गरम गरम वरण भात
▪पुलं चं पुस्तक , त्यांचं पेटीवादन … त्यांचं कथाकथन,
▪आशाच्या हुकमी आवाजातलं
“जाईए आप कहा जाएंगे… , ”
▪बिस्मिल्लांचे सनईचे सूर ,
▪सुधीर फडके यांचं “धुंदी कळ्यांना …” भावगीत
▪सोनचाफ्याची फुलं
▪अगदी आपल्याला हवी तशी बनलेली कॉफी
▪थोडीशी तिखट भेळ , गरम भजी , चुलीवरची भाकरी , गरम हुरडा आणि चटणी
▪रातराणीचा सुगंध ,
▪थंडीत खाल्लेलं टेंडर कोकोनट ,
▪गाण्याच्या मैफिलीत जागवलेली पौर्णिमेची रात्र ,
▪पहाटे दिसलेली शुक्राची चांदणी
▪अचानक नजरेला पडलेला भारद्वाज
▪आपण लावलेल्या गुलाबाला आलेली पहिली कळी
▪दवांत न्हाऊन निघालेली मोगऱ्याची फुलं …

सुख सुख म्हणतात ते हेच…
….. आणखी काय पाहिजे…..छोटी छोटी सुख शोधाल तर जीवन जगाल !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu