उत्तेजनार्थ पारितोषिक | मनातल्या कवितेचे पान -कुंदा पित्रे
मनातल्या कवितेचे पान
रचनाबंध — १-ल्या ओळीत -दोन शब्द
२-या ओळीत – तीन शब्द
३-या ओळीत – दोन शब्द
४ थ्या ओळीत – एक शब्द
दुस-या व तिस-या ओळीत यमक साधलेले आहे .
** कवितेचे नांव —मनातल्या कवितेचे पान**
हळूवार जपते
मनातल्या कवितेच्या पानांला
भावनेच्या गाठोड्याला
प्रेमाने—-१)
सुगंधी क्षण
गोंदले गेलेत मन:पटलावर
बाल्यातील बागडण्यावर
मायेचे—-२)
स्मृति पटलावर
मनांतील कविता उमटली
तारूण्याच्या बहरातली
प्रितीची—-३)
आयुष्य बदलले
कवितेच्या पानांने खुणावले
सुखदु:ख सांगितले
काव्यातून—४)
अंतर्मन चालले
मनाच्या आतले मन
गुणगुणले बेभान
शर्वरीसम—५)
मनातली कविता
रूजली,वाढली, फुलली
साहित्यात रूळली
सन्मानाने—-६)
किर्तीवंत,यशवंत
मनातल्या कवितेचे पान
गंझाळले छान
निशिगंधासम —७)
– कवियत्री — कुंदा पित्रे
मुंबई
उत्तेजनार्थ पारितोषिक (कविता)


