जे.आर.डी.टाटा ©मुकुंद कुलकर्णी

दि.29 जुलै 1904 रोजी पॅरिस येथे जहांगीर रतनजी दादाभाई टाटा ऊर्फ जेआरडी टाटा यांचा जन्म झाला . रतनजी दादाभाई टाटा आणि त्यांच्या फ्रेंच पत्नी सुनी यांचे ते दुसरे अपत्य . जेआरडींचे वडील जमशेटजी टाटांचे चुलत भाऊ . आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण फ्रान्समध्ये गेले . पॅरिसमधील जॅन्सन डी सॅली स्कूलमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले . दुसऱ्या महायुद्धाच्या काळात टाटांनी फ्रेंच सैन्यातून एक वर्षाचे अनिवार्य सैनिक शिक्षण प्राप्त केले होते .

लंडन , जपान , फ्रान्स आणि भारत येथे टाटांचे शिक्षण झाले . कॅथिड्रल आणि जॉन कोनॉन स्कूल मुंबई येथे ते शिकले . जेंव्हा त्यांचे वडील टाटा कंपनीत जॉईन झाले , तेंव्हा त्यांनी आपले कुटुंब लंडन येथे हलवले . जेआरडी टाटांच्या आईचा वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी मृत्यू झाला . त्यानंतर टाटांच्या वडिलांनी आपले कुटुंब भारतात हलवण्याचा निर्णय घेतला . त्यांनी टाटांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले . त्या दरम्यान ते फ्रान्सचे नागरिक असल्यामुळे त्यांना किमान एका वर्षासाठी फ्रान्सच्या सैन्यात दाखल होणे अनिवार्य होते . सैन्यातले प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर टाटांची केंब्रिज येथून इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती . पण त्यांच्या वडिलांनी त्यांना टाटा कंपनीत सामील होण्यासाठी भारतात परत बोलावले .

इ.स.1929 साली फ्रेंच नागरिकत्वाचा त्याग करून जेआरडी भारताचे नागरिक झाले आणि त्यांनी टाटा उद्योग समूहात प्रवेश केला . इ.स.1929 साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला . वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले . इ.स.1932 साली त्यांनी टाटा एअरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमान वाहतूक कंपनीची स्थापना केली . पुढे इ.स.1946 साली तिचे नाव बदलून एअर इंडिया ठेवले गेले . भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे ते जनक मानले जातात .

वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी म्हणजेच इ.स.1938 साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले .ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते . त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या 14 कंपन्या होत्या . टाटांच्या काळात त्यात 91 कंपन्यांची भर पडली . रसायन , वाहन , चहा , माहिती , हॉटेल आणि तंत्रज्ञान अशा नवीन क्षेत्रात त्यांनी टाटा उद्योग समूहाचा विस्तार केला . उद्योग समूहाच्या विस्ताराबरोबरच त्यांनी इतर अनेक संस्था स्थापन केल्या . भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी इ.स.1936 साली टाटा समाज विज्ञान संस्था आणि इ.स.1945 साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधन संस्था स्थापण्यात पुढाकार घेतला . आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय इ.स.1941 साली मुंबईत सुरू केले .

एअर इंडिया जेआरडींच्या कुशल मार्दर्शनाखाली असताना इ.स.1978 साली तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंनी त्यांची चेअरमन पदावरून उचलबांगडी केली . त्याचे जेआरडींना तीव्र दुःख झाले होते . ब्रिटिश वृत्तपत्र डेली टेलिग्राफ ने या निर्णयावर कडाडून टीका केली होती . पण , जेआरडींचे विमान उड्डाणाचेप्रेम कमी झाले नव्हते . इ.स.1982 साली वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी एका व्हिंटेज विमानाने कराचीहून मुंबईला उड्डाण केले होते .

इ.स.1945 साली त्यांनी टाटा मोटर्स ( पूर्वाश्रमीची टेल्को ) ची स्थापना केली . इ.स.1968 साली त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची स्थापना केली . जेआरडी आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य तो आदर आणि सन्मान देण्यासाठी सुप्रसिद्ध होते . ह्यूमन रिसोर्सेसच्या संदर्भात आपली तत्त्वे जेआरडी अशी मांडतात , ” When a number of persons are involved I am definitely a consensus man ….. but that does not mean that I do not express my views ….. You have to adapt yourself to their ways and deal accordingly and draw out the best in each man . In 50 years I have dealt with a hundred top directors and I have got on with all of them . At times it involves suppressing yourself . It is painful but necessary . To be a leader you have got to lead human beings with affection . ” अॉगस्ट 2002 च्या आऊटलुकच्या अंकात तेंव्हाचे ईन्फोसिसचे चेअरमन प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती जेआरडींविषयीचा आपला आदर असा व्यक्त करतात ,

” JRD was among the first to realise that employees are among the most important resources in any organisation . He introduced employee – friendly measures such as the eight hour working day , free medical aid and workers provident scheme . Many of these subsequently have been adopted as statutory requirements by law . “

जेआरडींचा पत्र व्यवहार विपुल होता . इ.स.1955 साली प्रख्यात समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांना एका पत्रात ते लिहितात , ” I must confess that I do not share your understanding of the capitalist system or it’s place in history ….. I believe that in most part of the world the system of free enterprise , far from dying , will be given a new lease of life in recognition of it’s ability and willingness to serve the community well ….. “

जेआरडी नेहमी म्हणायचे ते प्रमुखपदी असतानादेखील टाटा समूहाचा विस्तार अतिशय जलदगतीने होऊ शकला नाही , कारण भारतासारख्या बंदिस्त अर्थव्यवस्थेत कुठल्याही प्रकारच्या विधिनिषेध नसलेल्या अनैतिक ( unethical ) व्यावसायिक योजना राबवून व्यवसाय वाढवण्यात त्यांना रस नव्हता . इ.स.1992 साली जेआरडींना ‘ भारतरत्न ‘ मिळाल्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जेआरडींचा सत्कार समारंभ आयोजित केला होता . त्या समारंभात आपले मनोगत व्यक्त करताना जेआरडी म्हणाले होते , ” An American economist has predicted that in the next century India will be an economic superpower . I don’t want India to be an economic super power . I want India to be a happy country . “

जेआरडींना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाले . त्यापैकी विशेष उल्लेखनीय म्हणजे इ.स.1957 साली भारत सरकारने त्यांना ‘ पद्मविभूषण ‘ पुरस्काराने गौरवले . तर , इ.स.1992 साली त्यांना ‘ भारतरत्न ‘ या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले .

दि.29 नोव्हेंबर 1993 साली वयाच्या 89 व्या वर्षी त्यांचे जिनेव्हा स्विट्झरलँड येथे वृद्धापकाळाने निधन झाले .

” Uncommon thinkers

reuse what common

thinkers refuse . “

” Always aim at

perfection for only

then will you achieve

excellence . “

” When you work , work

as if everything

depends on you .

When you pray , pray

as if everything

depends on God . “

” I never had an interest

in making money .

None of my decisions

were influenced by

whether it would bring

me money or wealth . “

आपल्या कर्तृत्वाने जेआरडींनी भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह असण्याचा मान टाटा उद्योगसमूहाकडे टिकवून ठेवला . उद्योगधंद्याच्या विकासाबरोबरच समाजसेवा , सांस्कृतिक सहभाग , कला अशा अनेक क्षेत्रात जेआरडी यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे . सामाजिक बांधिलकी साठी आपले योगदान देण्यात टाटा उद्योगसमूह कायमच अग्रेसर राहिला आहे . उद्योगपतींच्या नामावलीमध्ये आजही जेआरडींच नाव अग्रभागी घेतलं जातं .

भारतीय उद्योगधंद्यांना जगाच्या नकाशात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ह्या असामान्य उद्योगपती व आदरणीय व्यक्तीमत्वास त्रिवार प्रणाम !

©मुकुंद कुलकर्णी
pc: google, tata.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu