गोकुळाष्टमी

कृष्णाभाक्तीचा अलोट पूर म्हणजे गोकुळाष्टमी . श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्णाचा गोकुळात जन्म झाला म्हणून या तिथीला गोकुळाष्टमी म्हणतात . या दिवशी मध्यरात्री कृष्णजन्माचा सोहळा साजरा केला जातो . दुसऱ्या दिवशी सर्व लहानथोर दहीहंडी फोडतात . कृष्णाने जगण्यातील रिक्तता दूर करून त्यात जीवनरस ओतला आणि ते चैतन्यमय केलं . गोकुळाष्टमी हा दिवस या गुणांचं स्मरण करण्याचा दिवस होय .कृष्णात दैवी गुण अपरंपार असूनही त्याचा आचार व व्यवहार माणसासारखा असल्याने त्याने माणसाच्या अंतःकरणाशी थेट संवाद साधून मानवी जीवनाला परमसुखाच्या वाट मोकळ्या करून दिल्या . श्रीकृष्णाच व्यक्तिमत्व बहु आयामी , सर्व गुण संपन्न आणि सर्व श्रेष्ठ अहे. त्याचं चरित्र हे सर्वस्पर्शी व सर्वव्यापी आहे . पुरुषार्थाची सर्व लक्षणे त्याच्या ठायी मूर्तरूप असल्याने जग त्याला पूर्ण पुरुष मानते .

संपूर्ण सृष्टीचं मनोविज्ञान त्यास अवगत असल्याने तो योद्धा होता , थोर मुत्सद्दी होता , धर्माचा प्रणेता होता , अधर्माचा संहारक होता , ज्ञानियांचा राजा आणि भक्तांचा कल्पतरू होता . त्याने गीतेत सांगितलेले तत्वज्ञान म्हणजे वैदिक संस्कृतीचा सार आहे . सर्वसामान्य माणसाबद्दल श्रीकृष्णाला वाटणारा जिव्हाळा आणि त्यांच्या उद्धारा बद्दलची त्याला असलेली तळमळ यामुळेच तो आपल्याला माता – पिता – बंधू – सखा या नात्याने जिवलग व भक्तवत्सल वाटतो . त्याने जगाला धर्माची व्यावहारिकता सांगितली आणि परमार्थाची मोठी पेठच उभारली . म्हणून त्याला ‘ जगद्गुरु ‘ म्हणतात .

कृष्ण भक्तीने ओथंबलेलं संत साहित्य म्हणजे कृष्णलीलांच गुणगानंच . याचे मनन – चिंतन या दिवशी केल तर माणसांच्या जीवनात प्रेम आणि भक्ती या दोन्ही गुणांचा विकास होऊ शकतो . जगण्यासाठी हेच दोन रस खूप पोषक आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu