सदर – डिजिटल संस्कार

Thinkmarathi.com
 ( मराठी ई -मासिक ) 
 
सादर करत आहे , नवीन सदर –  डिजिटल संस्कार :
 
आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते, त्यासाठी ते मुलांना हे असं कर , असं करू नको अस सांगतही असतात, पण हल्लीच्या मोबाईल आणि डिजिटल च्या जमान्यात मुलं आपलं कितपत ऐकतात हा प्रश्नच आहे. मग त्यांना कळेल अशा माध्यमातून , म्हणजेच त्यांच्यासाठी जवळचे असलेले डिजिटल माध्यम वापरून आपण हे काम करण्याचा प्रयत्न  केला तर ??  संस्कार अस नुसतं न म्हणता त्याला एखादे मॉडर्न विशेषण लावून त्यांना ते आपलंस वाटेल अस काही केलं तर मुलंही हे काहीतरी इन आहे … ट्रेंडिंग आहे अस म्हणून त्याला आपलंस नक्की करतील , तुमचे बाबा आदमच्या जमान्यातले विचार आम्हाला सांगू नका अस म्हणणाऱ्या मुलांना प्रत्येक गोष्टीच्या मागचे वैज्ञानिक कारण सांगून पटवले तर त्यांना नक्कीच पटेल. आपल्या प्रत्येक चालीरीती मागे, काही म्हणी, सुविचार या सर्वांच्या मागे  आरोग्याशी निगडित , रोजच्या जीवनात शिकावण मिळेल ,आयुष्यात कधी अडचण आली , संकट आली तर डगमगून न जात खंबीर पणे त्या संकटाचा सामना कसा करायचा या साऱ्या शिकवणी आहेत. त्याची नवीन पिढीला डिजिटल माध्यमातून ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.            
या सदरात घेऊन येणार आहोत – 
१. आजी आजोबांच्या गोष्टी – विडिओ / ऑडिओ 
२. जाणून घ्या आपली संस्कृती / परंपरा 
३. या गोष्टी आपण का करतो ? प्रत्येक रूढीमागचे कारण … 

४. इतिहासात डोकावून पाहताना – आपल्या इतिहासात अनेक वीरांगना होऊन गेल्या , आता वेळ आली आहे आपल्या मुलींना त्यांच्या शौर्याची , कर्तबगारीची ओळख करून देऊन आपल्या मुलींमध्येही दुर्गा माता आहे ,त्यांना  त्यांच्या शक्तीची जाणीव करून देण्याची. हल्ली मुले , मुली फक्त व्हिडीओ गेम्स मध्ये रमलेले असतात , त्यांना मैदानी खेळांची ओळख , विशेषतः: असे खेळ जे म्हणायला खेळ आहेत पण आत्मसंरक्षण करायला एकदम उत्तम आहेत अशा खेळांची माहिती  विडिओ , लेखांद्वारे करून देणे हा या सदरचा उद्देश आहे. 

आम्ही हि माहिती वेगवेगळ्या ठिकाणांनहून संकलित करत आहोतच पण आपणास ही या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर आपणही गोष्ट सांगतानाचा  विडिओ , ऑडिओ , इतर माहिती लिहिलेले लेख , काही जुने फोटोस आम्हाला पाठवू शकता. निवडक साहित्याला थिन्कमराठी. कॉम वर प्रकाशित केले जाईल. 

या शिवाय इतरही अनेक विषयांवर आपल्याला लेख लिहायचे असल्यास आपले लेख, साहित्य आम्हाला खाली दिलेल्या ई-मेल वर मेल करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu