Android फोन विकत घेताना……

आजच्या धकाधकीच्या जिवनात आपण जास्त विचार न करता मोबाईलच्या दुकानात जाऊन सरळ “ चांगल्यातला मोबाईल दाखवा दादा” म्हणून तो जो मोबाईल देईल तो घेतो व नंतर त्याच कीमतीत याहुन चांगला फोन कोणी घेतला कि मग आपल्याला कुठे तरी वाटते की घेतानाच आपण ४ ठीकाणी विचारायला हवे होते. काही साध्या गोष्टी आपणाला माहीत असणे गरजेचे असते. आता आपल्या वापरानुसार android फोन घेणे हा थोडासा व्यैयक्तिक वीषय आहे पण आता चांगली व्यैशीष्ट्ये असलेली फोन्स बाजारात येत आहेत. मोबाईल बॉक्सवर configuration खालीलप्रमाणे पाहावे.

१ स्क्रीन साईजः सामान्यतः फोनची स्क्रीन ४.७”(ईंच) व त्या पुढे असावी. बाजारात ४.७” च्या पुढे ५”,५.५”,६” पर्यंत स्क्रीन साईज असलेले फोन आहेत. त्यात ५” चे फोन जास्त प्रमाणात लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.
२ स्क्रीन प्रकारः स्क्रीन टाईप बघताना ती hd(high quality) आहे का हे बघावे. आज ८ ते ९ ह्जारांवर मोबाईल्सची स्क्रीन hd असते. व १० ते १२ ह्जारांपासुन स्क्रीन amoled(Active-Matrix Organic Light-Emitting Diode) जिने काही प्रमाणात बॅटरीची बचत होते. गोरिला ग्लास ३ हा प्रकार स्क्रीन वर स्क्रॅचेस येऊ नयेत म्हणुन वापरतात.
३ रॅमः ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कम्प्युटरप्रमाणेच स्मार्ट्फोनला रॅम येते. कमीत कमी रॅम १ जीबी(gigabyte) असावी कारण भरपुर apps मोबाईल मध्ये असतील तर १जीबी पेक्षा कमी रॅम वर मोबाईल व्यवस्थित चालत नाही. एकतर तो ह्ळु (slow) चालेल किंवा मग अटकेल(hang). या कारणांसाठी मोबाईलची रॅम हि १जीबी किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजे १.५जीबी, २ जीबी, ३ जीबी चालेल पण तेवढा मोबाईल महागडा होईल. साधारणतः १ जीबी चे मोबाईल बाजारात ६ ते ७ हजारांपासुन चालु होतात.
४ रॉमः किंवा फोन मधील एकुण जागा (internal storage). ही ४ जीबी पासुन सुरु होते. बाजारात ४,८,१६,३२ जीबी पर्यंत रॉम असलेले मोबाईल उपलब्ध आहेत. पण घेताना कमीत कमी ८ जीबी रॉम असणारा मोबाईल घ्यावा. नाहीतर OS ने जास्त जागा खाल्ली जाऊन मग apps ला जागा कमी पडते व असा प्रकार ४ जीबी मोबाईल मध्ये जास्त होतो. बाजारात ७ ते ८ हजारांपासुन ८ जीबी रॉम असणारे मोबाईल मिळतात..स्टोरेज कॅपॅसीटी कमीत कमी ३२ जीबी पर्यंत मेमरी कार्ड्च्या साहाय्याने वाढवता येईल अशी बघावी.
५ बॅटरीः तुम्ही चांगले वैशीष्टय असणारा महागड्यातला महाग फोन घ्या पण बॅटरी लवकर म्हणजे ३ ते ४ तासात ठप्प होत असेल तर त्या फोनचा काय उपयोग? २००० Milliamp Hour (mAh) बॅटरी फारफार तर ५ तासांपर्यंत चालेल त्यानंतर चार्ज करावी लागेल त्यातही तुम्ही मोबाईल ला चिकटून बसणारे असाल तर मग झालेच! दिवसभर चार्जींग केबल फोनला लावुन बसावे लागेल. म्हणुन ८ ते १४ तास चालणारी २५०० ते ३००० mAh ची बॅटरी असलेले फोन नीवडावे.
६ कॅमेराः ५ ते १३ मेगापिक्सेल कॅमेरे असणारे फोन बाजारात आहेत पण त्यातुन निवडावा कोणता हा खरे तर प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. सॅमसंग चा ५ MP कॅमेराचा फोटो हा मायक्रोमॅक्सच्या ८ MP कॅमेराच्या फोटोपेक्षा सरस आहे. म्हणजे मोबाईल घेताना तुम्हाला तुमचा बजेट कीती आहे त्यात येणा-या चांगल्यात चांगल्या मोबाईलचा कॅमेरा कीती MP आहे आणि तो तितकीच चांगली प्रतीमा देतो का? का दुसरे बॅण्ड्स चे मोबाईल याहुन कमी MP असून चांगली प्रतिमा देतायेत हे बघावे. शेवटी विषय पैशाचा आहे, जास्त पैशे मोजले की सगळे काही चांगले मिळेल. पण काही स्वस्त बॅण्ड याला अपवाद ठरत आहेत आणि महागड्या कंपनीजला आव्हान देत आहेत.
७ व्हर्जनः android version नवे आहे का हे बघुन घ्यावे. सध्या ४.४ किटकॅट android version चे मोबाईल बाजारात आहेत ज्यांना ५.० लॉलीपॉप चे अपडेट्स मीळतात. असे मोबाईल घ्यावेत. पुढे लवकरच android M ६.० हे लेटेस्ट व्हर्जन येणार आहे. त्याचा सपोर्ट मिळावा म्हणुन नवीन OS updated मोबाईल घ्यावेत.
ह्या झाल्या किमान गोष्टी! आता मोबाईलमध्ये प्रोसेसर किती हवा आहे, ग्राफिक्सला सपोर्ट आहे का, फोन गरम जास्त होतो का? कीचकट गोष्टी पण समजुन घ्याव्या.
PC:Unknown

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu