कोकण म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर येत ते सह्याद्रीच्या पर्वत रंगा ,माडांच्या रांगा, आंबा ,काजू , कोकमाची ,फणसाची झाड आणि अथांग समुद, व मोठमोठ्या नद्या.असा निसर्गाचा वरद हस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. कोकणातील खूपशी ठिकाण जग प्रसिद्ध आहेत लोटे परशुराम, वेळणेश्वर, गणपतीपुळे, हेदवी , डेरवण ,पावस, मार्लेश्वर पण काही ठिकाण खूप सुंदर असून सुद्धा अपरिचित जरा हटके आहेत.
दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीही आमच्या गावाला म्हणजे चिपळूण जवळ सावर्डे येथे मी माझा मुलगा सुमेध माझे पती मंगेश व माझी आई असे ४जण गेलो होतो नेहमीची ठिकाण पाहून कंटाळा आला होता म्हणून जरा गुगलवर सर्च केलं तर काय आश्चर्य सावर्ड्या पासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर मालडोली बंदर आहे तेथे कोकण क्रोकोडाईल सफारी आहे. चिपळूण गुहागर मार्गावर आत शिरल्यावर प्रत्येक ठिकाणी श्री. संदेश संसारे यांचे कोकण क्रोकोडाईल सफारीचे फलक लावलेले आपल्याला दिसतात मालडोलीला पोहचल्यावर वशिष्ठी नदीचे विशाल पात्र आपल्या दृष्टीस पडते नदीत जाण्यासाठी तेथे मोटार बोटींची सोया केली आहे बोटीतून प्रवास करतांनाचा अनुभव खूपच छान होता अंदाजे ३ किलोमीटर आत गेल्यावर आपल्याला क्रोकोडाईल दिसायला लागतात आपल्या बोटिंजवळ मगरी येतात पण आपल्याला काहीही इजा करीत नाहीत अस्ताला जाणारा सूर्य आणि मगरींचे स्वछंद विहार करतानाचे दृष्य डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटते मनसोक्त फोटो व शुटींगच्या आनंद घेता येतो आपण बोटीत जवळजवळ १ ते १ १/२ तास मनसोक्त भटकत असतो ठिकाण खूपच स्वच्छ आहे
असा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी नक्की जा कोकण क्रोकोडाईल सफारी ला.
मानसी मंगेश सावर्डेकर