टेक अपडेट्स : विंडोस १० च नवं अपडेट आता उपलब्ध

विंडोस १० च नवं अपडेट आता उपलब्ध : 

विंडोज १० या प्रसिद्ध डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टमचं नवं अपडेट जे या ओएसमध्ये अनेक सोयी जोडत आहे हे आता उपलब्ध झालं असून याचं नाव Windows 10 May 2020 Update असं आहे. विंडोज ओएससाठी मायक्रोसॉफ्टने विंडोज १० नंतर नवी आवृत्ती आणणार नसल्याचं जाहीर केलं होतं. यापुढे केवळ विंडोज १० लाच अपडेट्सद्वारे नव्या सुविधा जोडल्या जात आहेत. या अंतर्गत ठराविक महिन्यांनी एक मोठं अपडेट दिलं जातं त्यापैकी हे मे २०२० अपडेट आता डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. याचं व्हर्जन Windows 10 Version 2004 असं असणार आहे.

नव्या विंडोजमध्ये वेगवान कनेक्शन्स, डेस्कटॉपला नावे देणे, अधिक Kaomoji चा समावेश, एज ब्राऊजरमध्ये आता रॅमचा कमी वापर, नोटपॅडमध्ये अनेक वर्षांनी नव्या सोयी, कोर्टाना हा व्हॉईस असिस्टंट आता ओएस ऐवजी सिस्टम ऍप म्हणून उपलब्ध होणार असून आता चॅट प्रमाणे काम करेल म्हणजे बोलण्याऐवजी टाइप करून सुद्धा मदत मिळवू शकाल!

– By thinkmarathi.com Tech Team 

pc:google

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu