“जग संपत असेल तर… तुम्ही काय कराल?”

आज, जर जगाचा शेवट असेल, तर तुम्ही या क्षणी सर्वप्रथम काय कराल?

१) टू-डू लिस्ट बनवाल?

२) सर्वांना बोलावून त्यांची भेट घ्याल?

३) रडत बसाल?

४) जुन्या आठवणींमध्ये दिवस घालवाल?

 

बहुतेक तुम्ही टू-डू लिस्ट बनवाल. पण त्यात काय लिहाल? — खाणं, पाहणं, प्रॉपर्टी, की काहीच नाही?

 

बहुतेक तुम्ही काहीच करणार नाही. तुम्ही फक्त शेवटचे क्षण जगाल — स्वतःला स्पर्श करून स्वतःचा अभिमान बाळगाल की तुम्हाला मानव देहात जन्म मिळाला.

 

माझ्या या अनुभवावर मी काही विचार (कोट्स) लिहिले आहेत:

१) हृदय आणि मेंदू यांच्या मध्ये कुठेतरी आपले खरे अस्तित्व (लोकेशन) आहे; बाहेर कुठेही नाही.

२) प्रथम विश्व आपल्या आत आहे. आपले शरीर हेच आपले पहिले जग आहे; त्याच्या बाहेर दुसरं जग.

३) शेवटच्या क्षणी जे करण्याचा निर्णय तुम्ही घ्याल, तो आजपासूनच घ्या — तुमचा जन्म या जगाला डोळ्यांनी पाहण्यासाठी आणि स्पर्शाने अनुभवण्यासाठी झाला आहे. दुसऱ्यांच्या विचारांपेक्षा स्वतःला समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यातूनच तुमच्यातून नवीन विचारांचा जन्म होत राहील, आणि मग तुम्ही स्वतःला खरोखर भाग्यवान समजाल.

 

Main Menu