Love आज कल !!!

महोब्बत एक एहसासोकि पावन सी कहानी है ,
कभी कबीरा दिवाना था , कभी मीरा दिवानी है !

म्हटलं तर शब्दात मांडता न येणाऱ , पण कवितेतील शब्दातून व्यक्त होणारं तुमच्या आमच्या प्रत्येकाकडेच असणार पण फक्त आपल्यालाच अनुभवता येणार प्रेम ! प्रत्येक जण एकदातरी कधी तरी कुठे तरी या प्रेमाला धडकलेला असतोच. लहानपणी ,कॉलेज मध्ये, बसमध्ये कुठे न कुठे,  कुणा ना कुणाच्या प्रेमात माणूस एकदा तरी पडतोच, अस म्हणतात. फक्त सर्वांची व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी असते. याच्या फार थिअरित न जाता आताच्या तरुणांच्या भाषेत सांगायचं तर ‘ आपल बुवा अस्स आहे’ अस काहीस असत प्रेमच !
प्रेमाची मूळ भावना हि तशीच असली तरी वय, संस्कृती आणि काळ यानुसार प्रेमाची परिभाषा काहीशी बदलत जाते. म्हणजे कधी एके काळी ” जिथे सागरा धरणी मिळते , तिथे तुझी मी वाट पाहते ” म्हणणारी प्रेयसी आज काल … हे गीत गाते.
प्रेम हे जरी सारख असाल तरी प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते. व्यक्ती परत्वे बदलत असते. गेले काही वर्ष आपल्याकडे १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेम दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आता तर त्याच्या जोडीला आणखी ७ दिवस वेगवेगळे दिवस साजरे केले जातात.7 Feb : Rose Day, 8th Feb : Propose Day, 9th Feb : chocolate Day , 10th Feb Teddy day, 11th Feb Promise Day, 12th Feb Hug Day,13th Feb : Kiss Day and 14th Feb : Valentine’s Day …. हे वेळापत्रकच सोशल नेट्वर्किंग साईट वर शेअर होताना दिसत आणि तेवढ्याच उत्साहाने हे दिवस साजरे देखील केले जातात. आणि का करू नये ? प्रत्येकासाठी पर्सनल असणारी हि युनिवर्सल भावना सोशली साजरी होणार यात काय नवल? आणि यात वेगळीच मजा आहे. घर, कॉलेज, मित्र यातून वेळ काढून सगळेच प्रेमाला वेळ आणि महत्व देतातच.
प्रेम माणसाला बदलत , दुसरयाचा विचार करायला भाग पाडत. समृद्ध बनवत , जगायला शिकवत , ते कुणी शिकवावं लागत नाही. योग्य वेळी , योग्य ठिकाणी ते आपसूकच होत , मग कुणीही ,कितीही विरोध केला तरी प्रेमात पडलेली व्यक्ती त्या विरोधाला जुमानत नाही. अजूनही आपल्याकडे संस्कृती रक्षक व्हॅलेन्टाईन्स डे ला विरोध करतातच की. पण प्यार किया तो डरना क्या ? हे ब्रीदवाक्य समोर ठेऊन आजचा तरुण प्रेमाच्या बाजूने ताठ उभा आहे.
व्हॅलेन्टाईन्स डे म्हटल्यावर कॉलेज मधील तरुणांचा उत्साह वाखाणण्यासारखा असतो.
आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही वेगळ करण्याच्या प्रयत्नांत असतो. फुलं ,चोकलेट्स, गिफ्ट्स ,जोडीदाराला आवडणारी एखादी वस्तू या सर्वच गोष्टीचा सपाटा सुरु होतो फक्त आणि फक्त आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी…
बऱ्याच वेळेला जवळपास सर्वच कपल्स मध्ये हा दिवस जवळ आला की भांडण जर कमीच होतात. किंबहुना झालेली भांडण मिटतात देखील. खूप जोश , जल्लोष आणि उत्साहाने भरलेला हा दिवस कपल्स साठी अतिशय महत्वाचा असतो. हा दिवस साजरा करणार नाही अस कपल क़्कचितच सापडेल!!!

-अभिजीत इंजल

 
 PC:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu