पूर्वीच्या काळी नदीत पैसे (नाणी ) का टाकत ?
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अनेक लोक पाण्यामध्ये पैसे फेकताना दिसतील… पण असं का करतात बरं…याच्या मागचे कारण किती लोकांना माहीत आहे ? कधीतरी आपण रेल्वेने प्रवास करत असताना देखील आपले आई , बाबा , आजी , आजोबा यांच्यापैकी कोणी आपल्याला नाणी देऊन पाण्यात टाकायला सांगतात. खरतर सरकारला नाणी बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. मग आपण नाणी पाण्यात का टाकतो ?
पूर्वीच्या काळी पैसे नद्या, विशिंग वेल यांमध्ये फेकणं नशिबवान होण्याचा मार्ग मानला जात होता. पण पूर्वीच्या काळी तांब्याचे पैसे बनवले जायचे . आजच्या सारखे स्टील चे नाहीत .
कॉपर पाण्यात टाकल्यामुळे ते तुरटीसारखं काम करतात… त्यामुळे पाण्यात असलेला कचरा पाण्याखाली बसतो… त्यामुळे स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध होतं. तसंच कॉपर आपल्या शरीरासाठीही उपयोगी ठरतं… त्यामुळेच ही प्रथा पडली असावी.